काटोलच्या गानकोकीळा भाग्यश्री व धनश्री राममंदिर भूमिपूजनप्रसंगी गाणार अयोध्येत...

काटोलः भाग्यश्री व धनश्री वाटकर.
काटोलः भाग्यश्री व धनश्री वाटकर.

काटोल (जि.नागपूर) : ५ ऑगस्ट या दिवसाकडे जगाचे लक्ष्य वेधले असून या ऐतिहासिक दिवस प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाणार आहे. यानिमित्त नागपूर जिल्हातील काटोल येथील गानकोकीळा जुळ्या भगिनी आपल्या सुमधुर वाणीतून स्वरांनी मंत्रमुग्ध करणार असल्याचा क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. काटोल नगरीचा अभिमान वाढविणारी ही गौरवपूर्ण बाब ठरणार आहे. यादिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. त्यावेळी काही वाहिन्यांवरून थेट प्रसारण होणार आहे. भाग्यश्री व धनश्री वाटकर या काटोलच्या जुळ्या भगिनींच्या वाट्याला हे भाग्य आले आहे. परिसरात या भगिणी कौतुकाचा विषय ठरला आहे.

राम जन्मला सखे राम जन्मला...
अनेक स्वर संध्येत आपल्या गायणाची छाप पाडणाऱ्या भगिनींचे उत्तर रामायण कथेचे शीर्षकगीत 'हम कथा सुनाते है' सोशीयल मीडियावर फार लोकप्रिय ठरले. याच कर्तबगारीवर त्यांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आले. त्यांनी सांगितले की आम्ही ५ ऑगस्टच्या जन्मभूमी सोहळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी गायनाचा श्रीगणेशा' प्रभू राम जन्मला सखे राम जन्मला' या मराठी गीताने करणार आहोत. आम्ही महाराष्ट्रीयन असल्याने मराठीचा स्वार्थ अभिमान असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. राम जन्मभूमीत चरणस्पर्श करण्याची संधी आम्हाला गायन कलेमुळेच लाभली आहे. याप्रसंगी ‘राम सकल सुख धाम की’ सह अनेक लोकप्रिय भजनांतून स्वरसाज देणार असल्याचे त्यांचे जन्मदाते सुनिल व नलिनी वाटकर यांनी अभिमानाने सांगितले.

अधिक वाचा  :  नरखेड तालुक्यातील ५८ सेवा सहकारी संस्थांचे रुपांतरण झाले २४ संस्थेत, काय भानगड आहे, वाचा....

गायनाचा पिढीजात वारसा

गायक भाग्यश्री व धनश्री या गायनकला आजींकडून शिकल्या.आजीला वारकरी भजनाची आवड असल्याने सुनेलासुद्धा गाण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्याच वातावरणात भाग्यश्री व धनश्री या भगिणींनी भजन गायनास सुरुवात केली. काटोल तालुक्यात कचारीसावंगा खेड्यात जन्माला आलेल्या जुळ्या बहिणी गायनाच्या कसोटीत उतरल्याने त्यांचे गायन फार मनमोहक व लोकप्रिय ठरले आहे. संगीतविषारद होऊन त्यात आणखी भर घालतांना शिक्षणातसुद्धा त्या मागे न राहता विज्ञान शाखेत अंतिम वर्षाला शासकीय महाविद्यालयातून गुणवत्तेच्या बळावर शिक्षण घेत आहेत. घरची सामान्य परिस्थिती, वडीलांचा काटोल येथे व्यवसाय, ते आयुडीपी येथे वास्तव्यास असून मातापित्यांच्या मार्गदर्शनात आज ‘सोनियाचा दिवस’ अनुभवण्याचे भाग्य वाटकर परिवाराला आले. काटोलकरांची मान उंच करण्यास भाग्यश्री व धनश्री यशस्वी ठरल्या आहेत. हा सर्वांसाठी ऐतिहासिक दिवस ठरतो आहे. प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीत मंदिराच्या पाय भरणीच्या कार्यक्रमात गाण्याचे भाग्य या भगिंणींना लाभले , हे विशेष!  

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com