डायलिसिसवर जगतोय साहेब, उपचार करा, अन्यथा विषतरी द्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

नागपूर : कामगार रुग्णालयात डायलिसिसवर आयुष्य जगत असलेल्या किडनीग्रस्तांसाठी उपचाराची सोय नाही. यामुळे या रुग्णांना खासगीत रेफर करण्यात येते. किडनीग्रस्तांसाठी डायलिसिसची सोय असलेल्या संलग्न रुग्णालयाची कोट्यवधींची थकबाकी आहे. यामुळे खासगी रुग्णालयांनी उपचार थांबवले असल्याने डायलिसिसवरील किडनीग्रस्त मृत्यूच्या दाढेत आहेत. अशा रुग्णांनी आता जगण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. एकतर जगण्यासाठी उपचार द्या, अन्यथा विषतरी द्या, अशी मागणी किडनीग्रस्त रुगणांनी केली आहे.

कर्मचारी राज्य विमा योजना 1952 मध्ये अमलात आली. सुरुवातीपासून तर आतापर्यंत कामगारांच्या दरमहा वेतनातून 100 रुपयांमागे मालकाचे 4.75 पैसे, तर कामगाराचे 1.75 पैसे असे एकूण 6.50 पैसेप्रमाणे कपात होते. 21 हजार रुपयांपर्यंत दरमहा वेतन असलेल्या कामगारांना आरोग्य योजनेचा लाभ मिळतो. नागपूर विभागात दीड लाख विमाधारक कामगार आहेत. परंतु, उपचाराची सोय नाही.

- Video : शंकरपटात आता धावतात बैलांऐवजी हे... वाचा

यामुळे खासगी रुग्णालये संलग्न करण्यात आली. स्वतःच्या आरोग्याचा खर्च कामगार स्वतः करतो. यानंतरही त्यांना उपचारापासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात ट्रेंड युनियन कोऑर्डिनेशन सेंटरचे राष्ट्रीय सचिव संजय कटकमवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, किडनीग्रस्तांना एका आठवड्यात 3 वेळा डायलिसिस करणे आवश्‍यक आहे. सध्या 14 रुग्णांचा उपचार शहरातील श्रवण हॉस्पिटल येथे सुरू होते

या रुग्णालयाचे कंत्राट 1 जानेवारीला संपले. या रुग्णालयाचे 80 लाख रुपये थकीत आहेत. ही थकबाकी मिळाली नसल्याने 1 जानेवारीपासून रुग्णालय प्रशासनाने उपचार थांबवले. यामुळे किडनीग्रस्तांना मृत्यूच्या भीतीने घाबरले आहेत. पत्रकार परिषदेला कमलदीप सिंग कोचर, अजयकुमार यादव, हृषिकेश शर्मा, पदमा मस्के, मनीषा उके, देवेंद्र वाघमारे, नीलेश शेलार, रमण जाधव उपस्थित होते.

- नागपुरात आयकर विभागाची धडक कारवाई, चार व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे

गणेशपेठेतील कार्यालयासमोर उपोषण
यापूर्वी नागपुरात सुमारे चार ते पाच रुग्णालयांमध्ये किडनीग्रस्तांचे डायलिसिस होत होते. परंतु, अनेकांची थकबाकी अदा न केल्याने त्यांनी संलग्नता रद्द केली. अखेर एकाच रुग्णालयात डायलिसिस करण्यात येत आहे. मात्र, आता त्यांनीही हात वर केले. यामुळे किडनीग्रस्तांनी जगायचे कसे? हा प्रश्‍न आहे. कामगार रुग्णांची प्रचंड हेळसांड इएसआयसीकडून होत आहे. कर्मचारी विमा योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी आणि लेखी निवेदन दिले. मात्र, त्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखवली.

गणेशपेठेतील कर्मचारी विमा निगमच्या उपक्षेत्रीय कार्यालयासमोर किडनीग्रस्त सकाळी 11 वाजता उपोषणाला बसणार आहेत. किडनीग्रस्तांच्या जिवाला बरे-वाईट झाल्यास जबाबदारी कर्मचारी विमा निगमची असेल, असे कटकमवार यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidney petient agitation for treatment