यहॉं के हम सिकंदर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

राज्यात सत्तापालट झाली. पाच वेळा निवडून आलेल्या केदार यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. कॉंग्रेसला तब्बल 30 जागा मिळवून दिल्या.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे सावनेरचे आमदार तसेच पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले. भाजपला सत्तेबाहेर काढणारे केदार जिल्हा परिषदेचे किंगमेकर ठरले आहे.

सुमारे सात वर्षे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. राज्यातही भाजपची सत्ता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या झंझावातात त्यांचे नेतृत्व झाकाळून गेले होते. 14 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ते एकमेव आमदार होते. मात्र राज्यात सत्तापालट झाली. पाच वेळा निवडून आलेल्या केदार यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. कॉंग्रेसला तब्बल 30 जागा मिळवून दिल्या. आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही 10 उमेदवार निवडून आले आहेत. 58 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत तब्बल 40 जागा आघाडीने जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे

सविस्तर वाचा - कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलीसांचा उरला नाही धाक .

केदार यांनी आपल्या सावनेर मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना तोंडही वर काढून दिले नाही. येथील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा कॉंग्रेसच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. यावर त्यांची आपल्या मतदारसंघावरील पकड लक्षात येते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे संपूर्ण ताकद लावली होती. जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांना रिंगणात उतरवले होते. भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचारसभा ठेवली होती. स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र त्याचा काही फरक पडला नाही. ते पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्‍यांनी निवडून आले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: king maker sunil kedar