National Consumer Day: फुकट पाणी पिण्यापासून ते डॉक्टरांच्या तक्रारीपर्यंत हे आहेत ग्राहकांचे काही अधिकार; अशी नोंदवा तक्रार

Know about the rights of consumers on National consumer day
Know about the rights of consumers on National consumer day

नागपूर: आज 24 डिसेंबर म्हणजेच 'राष्ट्रीय ग्राहक दिन'. ग्राहक म्हणजे देवाचं दुसरा रूप असं म्हंटलं जातं. प्रत्येक दुकानदारासाठी किंवा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक म्हणजे सगळ्यात महत्वाची व्यक्ती. व्यवसाय करणारी प्रत्येक कंपनी किंवा व्यक्ती आपल्या ग्राहकांच्या समाधानातंच सुख मानते. पण प्रत्येकवेळी असं होतं का? 

कुठल्याही दुकानातून खरेदी करताना किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी दुकानदार महाग वस्तू विकतो तर कधी विकत घेतलेल्या वस्तूंमध्ये समस्या असते. पण अशावेळी आपण शांत बसतो यामुळे फसवेगिरीचं प्रमाण वाढतं. मात्र आता चिंता करू नका. ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

हे आहेत ग्राहकांचे अधिकार: 

ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकांना काही हक्क मिळाले आहेत. ग्राहकांना याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. 

1) सुरक्षेचा हक्क

आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं.

2) तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क

जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणजेच तुम्हाला ग्राहकांसाठीच्या न्यायालयात जाण्याची मुभा दिली आहे. 

3) माहितीचा हक्क

एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे.

4) निवड करण्याचा अधिकार

तुम्ही विकत घेत असलेली वस्तू ही कुठून घ्यायची कोणत्या कंपनीची किंवा ब्रांडची घ्यायची याबद्दल कोणीही तुम्हाला जबरजस्ती करू शकत नाही. या सर्व गोष्टींची निवड करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. 

ग्राहक म्हणून तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी: 

  • डॉक्टरांनी किंवा रुग्णालयानं रुग्णाच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास कारवाई होऊ शकते.
  • सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही
  • कंपनीनं दिलेलं वचन पाळलं नाही किंवा खोटं सांगण्यात आलं तर ग्राहक कंपनीवर कारवाई करू शकतात. 
  • चित्रपटगृहांमध्ये तुम्ही खाद्यपदार्थ नेऊ शकता. कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही.  
  • कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता. 

 
समस्या असल्यास अशी नोंदवा तक्रार: 

  • https://consumerhelpline.gov.in/ या ग्राहक हक्क तक्रार निवारणाच्या संकेतस्थळाला भेट द्या. 
  • होमपेजवर असलेल्या 1800114000 or 14404 या टोल फ्री क्रमांकावर फोने करा. 
  • या क्रमांकावर फोन करून तुम्ही आपल्या समस्येबद्दल थेट तक्रार करू शकता. 
  • तुमची तक्रार नोंदवली गेल्यानंतर मिळालेला रेफरन्स नंबर लक्षात ठेवा. 
  • तुमच्या तक्रारीबाबत मेसेज किंवा मेल तुम्हाला मिळेल. 
  • तुमच्या तक्रारीबाबत भविष्यात तुमहाला कळवण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com