रस्त्यावरील झाडांच्या खोडाला का असतो पांढरा-लाल रंग? जाणून घ्या यामागचं महत्वाचं कारण   

टीम ई सकाळ 
Thursday, 22 October 2020

दुसरा कुठलाच रंग न देता पांढरा किंवा लाल रंगच का? लहान मुलांनासुद्धा हा प्रश्न पडतो. यावेळी आपल्याकडे उत्तर नसते. पण आताचिंता करू नका. मुलांना आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकणार आहात.   

नागपूर : रस्त्यावरून जाताना नेहमीच रस्त्याच्या दुतर्फा झाडं दिसतात. या झाडांना पांढरा आणि लाल रंग असतो. अनेकदा असा प्रश्न पडतो की हिरव्यागार झाडांच्या खोडाला रंग का ? आणि दुसरा कुठलाच रंग न देता पांढरा किंवा लाल रंगच का? लहान मुलांनासुद्धा हा प्रश्न पडतो. यावेळी आपल्याकडे उत्तर नसते. पण आताचिंता करू नका. मुलांना आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकणार आहात.   

नक्की वाचा - हो साहेबऽऽ चोरी केली आम्ही; मात्र, एकाही पैशाला हात लावला नाही; वाचा काय सांगतात चोरटे

झाडांच्या खोडांवर रंग लावण्याचीही पद्धत खूप जुनी आहे. वास्तविक, हिरव्यागार वृक्षांना अधिक मजबूत करणे हे यामागील हेतू आहे. तुम्ही पाहिलं असेल की झाडांमध्ये बऱ्याचदा फट, चीर ह्या पडतात. आणि यामुळे साल बाहेर पडायला लागते, त्यामुळे झाडे कमकुवत होऊ लागतात. म्हणून, त्यांना मजबूत करण्यासाठी त्या रंग हा दिला जातो. रंग दिल्यामुळे झाडांचे आयुष्य देखील वाढते.

तसेच झाडांचे खोड रंगवण्यामागील हेतू म्हणजे झाडांना किडे-कीटक होत नाहीत. कारण हे कीटक कोणत्याही झाडाला आतून पोकळ करतात, परंतु रंगामुळे झाडांवर किडे राहत नाहीत. झाडे रंगविल्यामुळे झाडांची कीटकांपासून सुरक्षा होते.

झाडांना रंग दिल्यामुळे त्यांची सुरक्षाही सुधारते. रंग देणे हे दर्शविते की ही झाड वनविभागाच्या नजरेखाली आहेत आणि त्या झाडांना कोणालाही कापता येणार नाहीत. काही ठिकाणी फक्त पांढर्‍या रंगाचा उपयोग झाडांना रंगविण्यासाठी केला जातो, तर बर्‍याच ठिकाणी लाल आणि निळा रंग देखील वापरला जातो.

हेही वाचा - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास  

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यालगतची झाडेदेखील पांढर्‍या रंगानी रंगवलेली असतात, जेणेकरून रात्रीच्या अंधारात ही झाडे त्यांच्या रंगांमुळे गाडीच्या प्रकाशाने सहज उठून दिसू शकतील.

संपादन - अथर्व महांकाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know reason behind white and red colour of trees