
नागपूर : आर्किटेक्चर कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहरातील गोधनी रेल्वे येथील सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ लॉ मध्ये शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अॅप्टीट्यूट टेस्ट इन आर्कीटेक्चर' (नाटा)मध्ये एकच गोंधळ उडाला. परीक्षेदरम्यान अचानक सर्व्हर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. याशिवाय अनेक मुलांना खूप उशिराने संगणक मिळल्याने अनेक विद्यार्थ्यांवर रडण्याची वेळ आली. परीक्षेसाठी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्रित झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
आर्किटेक्चर कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात परीक्षेचे आयोजन केले होते. दुपारी साडेबारा ते अडीचदरम्यान ऑनलाइन पद्घतीने परीक्षा घेण्याचे ठरले होते. यासाठी शहरात सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ लॉ आणि सेंट्रल इंडीया कॉलेज ऑफ फार्मसा या दोन केंद्रावर किमान ७०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. विशेष म्हणजे यासाठी विद्यार्थ्यांना ११.१५ वाजता रिर्पोटींग करायचे होते.
मात्र मुले वेळेवर पोहचल्यावरही पेपर सुरू होण्याच्या केवळ पाच मिनिटाआधी विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले. यानंतर प्रत्येक प्रश्न सोडविल्यावर संकेतस्थळ लॉगआऊट करावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता. शिवाय भाग एकमध्ये फिजीक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि भाग दोनमध्ये प्रिफरन्स टाईप प्रश्नांचा समावेश होता. मात्र, महाविद्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
या महाविद्यालयामधील स्टॉफचे कोणतेही प्रशिक्षण न झाल्याचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागला. फिजीक्स, केमीस्ट्री आणि मॅथच्या पेपरसाठी रफ शीट देण्यात येणार होती. पेपर सुरू होऊन १० मिनिटे होऊन गेल्यानंतरही महाविद्यालय व्यवस्थापनाने रफ शीट दिलेली नव्हती, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. मुले स्वत:चे सॅनीटायझर घेऊन आली होती. मुलांची उपस्थिती पेपर संपल्यानंतर घेण्यात आली. दुपारी २.३० वाजता पेपर संपलेला असताना मुलांना थांबवून ठेवण्यात आले. अखेर काही पालकांनी जाब विचारीत व्हीडीओ शूटिंग सुरू केल्यानंतर दुपारी साडेतीन चार वाजता सोडण्यात आले
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.