गोरेवाड्यात बिबट, चितळाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

प्राथमिक रक्त व रक्तजल तपासणीत यकृत व मूत्रपिंड विकार समोर आला. दोन दिवसांपासून त्याची प्रकृती अस्वस्थ होती. आज सकाळी बिबट मादीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून तिला जाळण्यात आले. 

नागपूर : गोंदिया वन विभागातील अर्जुनी-मोरगाव वनक्षेत्रात तिडका ते सोनेगाव रस्त्याच्या शेजारी जखमी अवस्थेत आणलेल्या बिबट्याचा (मादी) गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आज मृत्यू झाला. बचाव केंद्रात आणल्यापासूनच बिबटाची परिस्थिती गंभीर होती. तिला वाचविण्यासाठी बचाव केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले; मात्र ते अपयशी ठरले. गोंदिया येथील चितळाचाही शनिवारी रात्री बचाव केंद्रात मृत्यू झाला. 

गोरेवाडा बचाव केंद्रात आणलेल्या बिबट्याचे मागील दोन्ही पाय निकामी झाले होते. त्यामुळे ती चालू शकत नव्हती. 22 जूनपासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते, प्राथमिक रक्त व रक्तजल तपासणीत यकृत व मूत्रपिंड विकार समोर आला. दोन दिवसांपासून त्याची प्रकृती अस्वस्थ होती. आज सकाळी बिबट मादीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून तिला जाळण्यात आले. 

हेही वाचा : पेरले पण उगवले नाही...आता घोंगावतेय हे संकट 

डॉ. मेघा कावरे, डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलंगथ व डॉ. भाग्यश्री भदाणे यांनी त्याच्यावर उपचार केले. विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे, वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्र संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, सहायक वनसंरक्षक एच. व्ही. माडभुषी, एच. एम. किनकर, पुष्पा पाठराबे यांच्या समोर शवविच्छेदन करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard dies in Gorewada