नागपुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८० हजारांच्या उंबरठ्यावर; १० टक्क्यांपेक्षाही कमी रुग्ण बाधित

राजेश प्रायकर 
Friday, 16 October 2020

शहरात आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ८० हजारांच्या उंबरठ्यावर असल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाची पकड सैल झाल्याचे दिसून येत असले तरी संकट कायम असल्याने नागरिकांनी उपाययोजनांवर भर देण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

नागपूर ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दररोजचा आलेख आता दहा टक्‍क्यांपेक्षाही खाली घसरल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सात हजारांवर तपासणी नमुन्यातून ६७४ नवे बाधित आढळून आले तर जिल्‍ह्यात ११ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली.

शहरात आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ८० हजारांच्या उंबरठ्यावर असल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाची पकड सैल झाल्याचे दिसून येत असले तरी संकट कायम असल्याने नागरिकांनी उपाययोजनांवर भर देण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

शुक्रवारी मेडिकल, मेयो, एम्स, माफ्सू, नीरी व खाजगी लॅबमधून आलेल्या एकूण ७ हजार २८९ तपासणी नमुन्यातून ६७४ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ८९ हजार ७६१ पर्यंत पोहोचली. बाधितांचा दररोजचा आलेख खाली घसरला असला तर पाचेश ते सातशे बाधित आढळून येत असल्याने शनिवारी बाधितांची संख्या ९० हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी एकूण २० कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यात शहरातील ९ तर ग्रामीण भागातील दोघे, असे जिल्ह्यातील एकूण ११ जणांचा समावेश आहे. या २० मृत्यूसह बळींची संख्या २ हजार ९१२ पर्यंत पोहोचली. गेल्या काही दिवसांत बळी तसेच बाधितांचा आलेख खाली आला असून कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

कोरोनावर मात केल्याने आज १००९ रुग्णांचे चेहरे फुलले. आतापर्यंत ७९ हजार ८५३ बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे तूर्तास तरी आशादायक चित्र आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, मेडिकल, मेयो, एम्ससह डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कोरोनाची पकड सैल होताना दिसून येत आहे. परंतु कोरोनाबाबत बेसावधपणा नागरिकांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांसह मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनीटायझर वापरण्याची सवयच लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

आता केवळ सात हजार रुग्ण

जिल्ह्यात आता सहा हजार ९९६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात शहरातील ४ हजार ३९३ तर ग्रामीण भागातील २६०३ बाधितांचा समावेश आहे. खाही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या रोडावली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने बाधितांच्या संख्येत घट होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less than 10 percent covid patients are in nagpur now