esakal | एवढाच काय तो दिलासा, टाळेबंदीत राज्यातील प्रदूषण पातळी घटली
sakal

बोलून बातमी शोधा

The lockdown reduced pollution levels in Maharashtra

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर महाराष्ट्रातील प्रदूषणात घट झाला आहे. अहवालात एप्रिल ते डिसेंबर २०१९ आणि जानेवारी ते मार्च २०२० ची प्रदूषणाच्या आकडेवारीचा समावेश आहे.

एवढाच काय तो दिलासा, टाळेबंदीत राज्यातील प्रदूषण पातळी घटली

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर  ः कोरोना काळात केलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील प्रदूषण पातळीमध्ये ३० ते ५५ टक्के घट झालेली आहे. मुंबई आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे वायुप्रदूषण शहराच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१९-२०२० चा अहवाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात ही माहिती पुढे आली आहे.

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर महाराष्ट्रातील प्रदूषणात घट झाला आहे. अहवालात एप्रिल ते डिसेंबर २०१९ आणि जानेवारी ते मार्च २०२० ची प्रदूषणाच्या आकडेवारीचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील घुग्गुस, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद ,नाशिक, कोल्हापूर, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, डोंबिवली, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, कुर्ला, सायन, वरळी, मुलुंड, बांद्रा, कुलाबा, विलेपार्ले, कांदिवली, महापे, नेरूळ, सोलापूर ही औद्योगिक शहरे प्रदूषित क्षेत्राच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. 

सर्व प्रकारच्या वायू प्रदूषण आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मुंबई आणि चंद्रपूर हे जास्त प्रदूषित विभाग ठरली आहेत, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे /यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाच्या आधारे दिली आहे.

क्लिक करा - ट्रेनमध्ये भुकेने व्याकुळ झाले होते चार महिन्याचे बाळ; जवळचे दूधही होते खराब; अखेर आरपीएफने दाखवली तत्परता 
 

देशातील एकूण २९ राज्ये आणि ३४४ शहरात ७९३ प्रदूषण मापन केंद्रे आहेत. महाराष्ट्रातील २५ शहरात ८४ वायू गुणवत्ता मापन केंद्रे आहेत. त्यातील २३ हे सतत वायू गुणवत्ता मापन केंद्र आहे. मागील नऊ वर्षाचे या शहरातील प्रदूषण, कोरोनापूर्वी आणि नंतरच्या वायू प्रदूषणाची आकडेवारी दिलेली आहे.

सल्फर डाय आॅक्साइडचे मर्यादेपेक्षा अधिक प्रमाण कल्याण, डोंबिवली, बांद्रा, कुलाबा, कुर्ला चंद्रपूर या शहरात आढळले. नायट्रोजन ऑक्साइडचे अधिक प्रमाण चंद्रपूर, बांद्रा, कुर्ला, सायन, विलेपार्ले, वरळी, नाशिक, महावे आणि सोलापूर येथे अधिक आढळले. घुग्गुस, चंद्रपूर शहर ,सायन आणि नेरळ येथे अधिक प्रमाणात धुळीकण आढळले . 

कल्याण, पुणे, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नागपूर, कांदिवली, कुर्ला आणि मुलुंड येथे २.५ पेक्षा अधिक प्रमाणात सूक्ष्म धुळीकण आढळले. तर चंद्रपूर, कल्याण, महावे, मुलुंड आणि नागपूर या शहरातील ओझोनचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. नागपूर, बांद्रा, डोंबिवली, कल्याण, सोलापूर,आणि पुणे येथे मर्यादेपेक्षा अधिक आढळले कर्बवायूचे अधिक प्रमाण आढळून आले आहे.

 उद्योग, कोळसा जाळणे, विविध वायू जाळणे, वाहतूक, वाहने, कचरा जाळणे, बांधकाम, रस्त्यांची धूळ आणि घरगुती प्रदूषण असे वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोत असल्याचेही प्रा. चोपणे यांनी म्हटले आहे.
 

  • जगातील अत्याधिक प्रदूषित २० शहरात भारतातील १४ शहरांचा समावेश
  • जगात दरवर्षी प्रदूषणामुळे ७० लाख लोकांचा मृत्यू होतो
  • घरातील प्रदूषणामुळे ३८ लाख लोक मृत्युमुखी पडतात
  • भारतात दरवर्षी १२ लाख लोक प्रदूषणामुळे मृत्यू पावतात

संपादन  : अतुल मांगे 

go to top