अक्षय तृतीया : हा आहे सोन्याची खरेदी करण्याचा पर्याय; होणार इतक्‍या कोटींची उलाढाल ठप्प

lockdown will affect the turnover of hundred crore
lockdown will affect the turnover of hundred crore

नागपूर :  गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. परंतु, वर्षाच्या पहिल्या सणालाच कोरोना विषाणूचे विघ्न आडवे आले आहेत. त्यामुळे या सणासाठी होणारी खरेदी विक्री झालेली नाही. त्यापाठोपाठ आता साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया रविवारी (ता. 26) साजरी होणार आहे. या दिवशी चांगला मुहूर्त असल्याने नवीन वाहन खरेदी, नवीन वास्तूत प्रवेश, सोन्याचे दागिन्यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच खरेदी बंद राहणार असल्याने शहरातील बाजारपेठेतील शंभर कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. 

अक्षय तृतीयेला कुटुंबातील दिवंगत सदस्यांना नवैध देऊन पित्र, सुवासिनींला अमरस पुरणपोळीचा नैवद्य दाखविला जातो. त्यामुळेच अक्षय तृतीयेला आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात आब्यांची खरेदी होते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक व्यवस्था आणि बाजारपेठा बंद आहेत. यंदा आंबा मोठ्या प्रमाणात न आल्याने आंबा चाखायला मिळण्याची शक्‍यता कमीच आहेत. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आलेले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद आहे.

एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे असतात. या काळातच लॉकडाउन आल्याने देशातील सर्वच अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे. या काळात रामनवमी, नवरात्र आणि मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यावरही कोरोनाचे विघ्न होते. त्यापाठोपाठ येणाऱ्या अक्षय तृतीयेलाही याचा फटका बसू लागला आहे. या मुहूर्तावर सोने, विविध धांतूचे भांडे, फ्लॅट अथवा घरे, वाहनाच्या खरेदीवर ग्राहकांच्या उड्या पडत असतात. 

गुढीपाडव्याला ऑटोमोबाईलही कोट्यावधी रुपयाची खरेदी होत असते. त्यालाही यंदा कोरोनाचे नख लागले. आता अक्षयतृतीयेलाही ग्राहकांचा वानवा राहणार आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर वाहनाच्या खरेदीसाठी शोरुममध्ये गर्दी होत असते. यंदा त्या शोरूम पुढे शुकशुकाट दिसू लागला आहे. यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राची मोठे नुकसान होणार असल्याचे फेडरेशन ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशीष काळे यांनी सांगितले. 

अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, अक्षयतृतीयेला सोन्याच्या खरेदीला महत्त्व असते. मात्र, यंदा दुकाने बंद असल्याने खरेदी होणार नहीत. त्यामुळे सराफा व्यवहार होणार नसल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लग्न सोहळ्यासाठीही दागीने, चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफा व्यापाऱ्यांकडे ग्राहकांची गर्दी असते.

सोन्याचे बुकिंग

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाउनमुळे गुढीपाडवा, अक्षय तृतीयेला सराफा बाजारपेठ बंद असला तरी ऑनलाईन सोने खरेदी करण्याची सोय काही पांरपारिक सराफा व्यवसायिकांनी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना सराफा व्यवसायिकांच्या अकाऊंटमध्ये काही रक्कम जमा केल्यास सोन्याचे बुकिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी विशीष्ट पद्धतीचे व्हाऊचर बुकिंग केलेल्या ग्राहकांना दिले जाईल. 

दहा टक्‍के होणार सोन्याची खरेदी

लॉकडाउनमध्ये काही सराफा व्यवसायिकांनी ग्राहकांना घरबसलल्या सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा नवा पर्याय समोर आणला आहे. त्यामुळे दहा टक्के सोन्याची खरेदी होईल अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

55 हजारांवर जाण्याची शक्‍यता
लॉकडाउननंतर ग्राहकांना सोन्याचे दागीने खरेदी करता येणार आहे. लॉकडाउन झाले त्यावेळी सोने 41 हजार 700 रुपये प्रति दहा तोळे होते. आज ते 48 हजार रुपयांवर पोहोचले आहे. लॉकडाउननंतर सोने 55 हजारांवर जाण्याची शक्‍यता आहे. 
- राजेश रोकडे, 
संचालक, रोकडे ज्वेलर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com