Look Back 2020 : काँग्रेसचे भजन, भाजपचे चिंतन; महविकास आघाडीनं मिळवला भाजपचा गड 

Look back 2020 Congress in front of BJP in Nagpur latest news
Look back 2020 Congress in front of BJP in Nagpur latest news

नागपूर :  मावळते वर्षे काँग्रेसला संजीवनी देऊन गेले. राज्यात थोड्या काही प्रमाणात सत्तेत प्रतिनिधित्व मिळाल्याने कार्यकर्ते सक्रीय झाले आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत घवघवित यश मिळले. महाआघाडी एकत्रित आल्याने ॲड. अभिजित वंजारी यांचे भजन जमले तर महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाने भाजपला चिंतन करण्यास भाग पाडले.

सर्वसामान्यांसाठी सरते निराशाजनक ठरले. करोनाने वर्षातील सुमारे तास ते आठ महिने लोकांना घराबाहेरच पडू दिले नाही. दुसरीकडे राजकीय पुढाऱ्यांना कामाला लावले. मात्र २०२० येतानाच काँग्रेसला चांगले संकेत देऊन गेले. विधान सभेच्या निवडणुकीत सहापैकी दोन जागा काँग्रेसने भाजपकडून हिसकावून आणल्या. उत्तर नागपूरमधून डॉ. नितीन राऊत यांनी पुनरागमन केले तर तब्बल दहा वर्षांच्या संघर्षानंतर विकास ठाकरे यांना पश्चिम नागपूरमध्ये विजयी पताका फडकावली. 

मध्य आणि दक्षिणमध्ये भाजपला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. भाजपला बाहेर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी आघाडी राज्यात तयार झाली. याचा थेट फयदा विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना मिळाला. नागपूर पदवीधरमध्ये अभिजित वंजारी यांच्या रुपाने नव्या दमाचा नेता काँग्रेसला मिळाला. नागपूरपासून तर थेट गडचिरोलीपर्यंतच्या पदवीधर मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकले. त्यामुळे सहा दशके अपराजित राहिलेल्या भाजपला प्रथमच पराभवाचा धक्का बसला. ही बदलाची नांदी मानल्या जात. 

चालू वर्षाच्या अखेरीस नागपूर महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. महाआघाडीला पराभूत करणाऱ्या चार वॉर्डाचा एक प्रभागाराचा निर्णय आधीच फिरवण्यात आला आहे. त्यामुळे एक किंवा फारफार तर दोन वॉर्डाचा प्रभाग यानुसार मनपाची निवडणूक घेण्यात येणार आहे. हा फॉर्म्युला कायम राहिल्यास महापालिकेतील पंधरा वर्षांची भाजपची सत्ताही उलथू शकते. 

नागपूर जिल्ह्यात ऊर्जा व पालकमंत्री नितीन राऊत, ग्रामीणमध्ये सावनेरचे आमदार पशु संवर्धन व क्रीडमंत्री सुनील केदार आणि काटोलचे लोकप्रतिनिधी अनिल देशमुख गृहमंत्री आहेत. तीन मंत्री असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बळ आले आहे. राष्ट्रवादीने विदर्भात विस्ताराचा प्रयत्न सुरू केला आहे. माजी केंद्रीयमंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्यावर विस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीची बांधणी सुरू आहे. वॉडर्डनिहाय महापालिकेची निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनासुद्धा यांचेही शहरात वजन वाढणार आहे. 

सेनेने आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना शहराचे संपर्क प्रमुख केले आहे. त्यांनी शहराची जबाबदारी प्रमोद मानमोडे यांच्यावर टाकली आहे. त्यांच्या दिमतीला अनुभवी नगरसेवक दीपक कापसे यांना दिले आहे. महाघाडीतील तीन पक्ष आता नागपूरमध्ये अस्तित्वासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र आघाडी टिकली तरच हे शक्य आहे. संदीप जोशी यांचा पराभव आणि विधानसभेतील दोन जागा भाजपने गमावल्या आहे. दोन जागा थोडक्यात बचावल्या. त्यामुळे भाजपलाही चालू वर्षात नव्याने नियोजन आणि फेरबांधणी करावी लागणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com