
‘एचआयव्ही’बाधित गर्भवतींकडून त्यांच्या होणाऱ्या बाळाला संसर्ग होतो. हे प्रमाण ३५ टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ‘नेव्हिरॅपिन’ हे औषध ‘एचआयव्ही’बाधित गर्भवतीला देण्यात आले. तसेच जन्मानंतर ‘एचआयव्ही’बाधित मातेच्या स्तनपानातूनही संसर्ग होण्याचा धोका असतो.
नागपूर : माता, नवजात बालक व कुमारवयीन मुले, मुली यांच्यातील एचआयव्ही संसर्गाबाबत मेडिकलमध्ये आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र मंजूर करण्यात आले होते. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) यासाठी अर्थसाह्य मिळणार होते. आगामी सात वर्षांसाठी ही मान्यता देण्यात आली. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये हे केंद्र हरवले आहे.
‘मेडिकल’मध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधा, रुग्णांची संख्या, गुणवत्तापूर्ण शास्त्रज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी त्यामुळे ‘क्रिटिकल ट्रायल युनिट’ला (सीटीयू) ‘एनआयएच’ने मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी निवड केलेले देशातील हे एकमेव रुग्णालय आहे.
जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
पुण्यातील ‘नारी’ या स्वयंसेवी संस्थेला अशा प्रकारची मंजुरी मिळाली आहे. जगभरातून दीडशे देशांतून प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यात मेडिकलमध्ये आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली. पुढील सात वर्षांसाठी ही मान्यता देण्यात आली आहे.
माता, नवजात बालक व कुमारवयीन मुले, मुली यांच्यातील ‘एचआयव्ही’ संसर्गाबाबत यात संशोधन करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव ‘शास्त्रीय सल्लागार समिती’कडे पाठविण्यात आला किंवा नाही, हे मात्र कळायला मार्ग नाही.
त्यानंतर प्रस्ताव ‘एनआयएच’ला सादर करण्यात येणार होता. याचेही काय झाले हे अद्याप गुलद्स्यात आहे. ससून रुग्णालय व अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ यांच्यातर्फे ‘एचआयव्ही’ संसर्ग झालेल्या गर्भवतींवर उपचार करण्यासाठी नुकताच एक प्रकल्प पूर्ण करण्यात आला.
‘एचआयव्ही’बाधित गर्भवतींकडून त्यांच्या होणाऱ्या बाळाला संसर्ग होतो. हे प्रमाण ३५ टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ‘नेव्हिरॅपिन’ हे औषध ‘एचआयव्ही’बाधित गर्भवतीला देण्यात आले. तसेच जन्मानंतर ‘एचआयव्ही’बाधित मातेच्या स्तनपानातूनही संसर्ग होण्याचा धोका असतो.
त्यामुळे नवजात बालकाला हे औषध देण्यात येते. सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत याचे या संशोधनाचे विश्लेषण पूर्ण होणार होते. परंतु, कोरोनाच्या या चक्रव्यूहात हा प्रकल्प अडकला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘एनआयएच’ने अर्थसाह्य केले होते.
सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची
असे होणार संशोधन
संपादन - नीलेश डाखोरे