esakal | महाज्योती‘चा कारभार प्रभारावर केवळ तीन जण कार्यरत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कर्मचाऱ्यांअभावी काम रेंगाळल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वीच अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली हे विशेष.

महाज्योती‘चा कारभार प्रभारावर केवळ तीन जण कार्यरत

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : बार्टी, सारथीच्या धर्तीवर महाज्योती संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला पूर्ण वेळ अधिकारी नसून तीन कर्मचारी कार्यरत आहे. कर्मचाऱ्यांअभावी काम रेंगाळल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वीच अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली हे विशेष.

बार्टी, सारथीच्या धर्तीवर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यात दीड वर्षापूर्वी आली. ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्त्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी याची स्थापना करण्यात आली.

घर खरेदीचे स्वप्न राहणार स्वप्नच! राज्य सरकार करणार स्टॅम्प ड्युटीत वाढ

अद्याप कोणत्याही प्रकारचे कार्य प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याचे दिसते. याचे मुख्यालय नागपूर येथे स्थापित करण्यात आले. या संस्थेला पूर्णवेळ अधिकारी नाही. प्रदीप डांगे यांना यांच्याकडे व्यवस्थापक पदाची धुरा देण्यात आली होती. आता त्यांना पदोन्नती मिळाली असून गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत. त्यांच्याकडेच व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे कामाचा व्याप जास्त आहे. त्यामुळे शनिवार, रविवारला ते कार्यालयात येतात. सुटीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. सुटीच्या दिवशी येत असल्याने सामान्य नागरिकांशी भेट होत नाही. इतर दिवशी ते नसल्याने लोकांना आल्या पावली परत जावे लागते. त्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून नावापुरती संस्था निर्माण केल्याची टीका होत आहे.