मुलाच्या लग्नाचे स्वप्न राहिले अधुरे, कोराडी रोडवर घडला थरार...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

नागपूर : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जबर धडक देऊन तिघांना चिरडले. या अपघातात तिघेही जागीच ठार झाले. ही थरारक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोराडीतील झुलेलाल कॉलेजसमोर घडली. अपघातानंतर चालक कार सोडून पसार झाला. नंदकिशोर व्यंकटेश पुसदकर, चंद्रभान इंगोले व चिंधुबाजी काकडे (तिन्ही रा. बैलवाडा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

नागपूर : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जबर धडक देऊन तिघांना चिरडले. या अपघातात तिघेही जागीच ठार झाले. ही थरारक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोराडीतील झुलेलाल कॉलेजसमोर घडली. अपघातानंतर चालक कार सोडून पसार झाला. नंदकिशोर व्यंकटेश पुसदकर, चंद्रभान इंगोले व चिंधुबाजी काकडे (तिन्ही रा. बैलवाडा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी तिघेही ट्रिपलसीट (एमएच- 31-बीएक्‍स-4540 या क्रमांकाच्या) मोटारसायकलने जात होते. झुलेलाल कॉलेजसमोर रॉंगसाइड भरधाव आलेल्या (एमएच-49-यू-7794) या क्रमांकाच्या कारने मोटारसायकलला धडक दिली. गंभीर जखमी होऊन तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक कार घटनास्थळीच सोडून पसार झाला.

भरधाव कारने तिघांना चिरडले
घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पारधी यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून तिघांचेही मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. तिघांचा बळी घेणारी कार ही सुनील मोरे नावाच्या व्यक्तीची असल्याचे कळते. कोराडी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून कारचालकाचा शोध सुरू केला आहे.

- गुन्हेगारांना सोडणार नाही, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्याची गृहमंत्र्यांनी दिली ग्वाही

कारचा चुराडा
ही कार एवढ्या वेगात होती की, दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. यामध्ये कारचा समोरच्या भागाचा चुराडा झाला. अपघात झाल्यानंतर कारचालक कारमधून उतरला आणि पळून गेला. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

चंद्रभान इंगोले यांच्या मुलाचे लग्न जुळले होते. विवाह सोहळ्यासाठी चंद्रभान हे दोन्ही नातेवाइकांसह मंगल कार्यालयाच्या शोधात होते. मंगळवारी सायंकाळी चंद्रभान, चिंदुबा आणि नंदकिशोर बोखारा परिसरात हॉलची माहिती काढत होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास काळाने त्यांच्यावर घाला घातला. मुलाच्या लग्नाची तयारी करण्यापूर्वीच चंद्रभान यांच्यावर काळाने झडप घातली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major accident at koradi road nagpur