गुन्हेगारांना सोडणार नाही, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्याची गृहमंत्र्यांनी दिली ग्वाही

Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर : वर्धा जिल्ह्यीतील हिंगणघाटमध्ये घडलेल्या जळित कांडामुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. पीडितेचा नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात जीवन मृत्यूशी संघर्ष सुरू असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी रात्री रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या तब्येतीची केली विचारपूस केली. अशाप्रकारचे कृत्य करणा-या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकराच लवकर कायदा करणार असल्याची ग्वाही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेच्या अंगावार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी संसदेतही उमटले. महिलांनी किती अत्याचार सहन करायचा? महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर अतिशय कडक कायदा केला पाहिजे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यांनी संसदेत केली.

गृहमंत्र्यांनी दिली रुग्णालयाला भेट
महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर तातडीने न्याय होत नाही. फक्त 'तारीख पे तारीख' दिली जाते, असा संताप त्यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांना व्यक्त केला. एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली अहे. तिच्यावर सध्या नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

- महिलांनी आणखी किती सहन करायचे? नवनीत राणा संसदेत भडकल्या


उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविणार प्रकरण
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय जळीत केंद्र मुंबईचे प्रमुख डॉ. सुनील केशवानी होते. डॉ. केशवानी यांनी पीडितेवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून तिला मुंबईला हलविण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केली.

मंगळवारी रात्री रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या तब्येतीची केली विचारपूस केली. अशाप्रकारचे कृत्य करणा-या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकराच लवकर कायदा करणार असल्याची ग्वाही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

पीडितेच्या तब्येतीची केली विचारपूस
पीडित प्राध्यापिकेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिला वाचविण्यासाठी डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तरीही येते अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे असून तिची श्‍वासनलिका जळल्यामुळे तिला श्‍वास घेण्यास त्रास होत असून कृत्रिम श्‍वास यंत्रणेवर ठेवले असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली आहे. धोका अजून टळलेला नसून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे उॉक्‍टरांनी सांगितले.

पीडितेवर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार असून तिच्यावरील उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमागील सत्य अजून उलगडलेले नाही. पुढील तपास सुरू आहे. पीडितेचा चेहरा पूर्ण भाजला असून डोळे आणि वाचाही गेल्याचा संशय डॉक्‍टरांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com