विविध वाद्यांचे आवाज काढतात तोंडाने; त्यांच्या आगळ्या कलेची रसिकांवर जादू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. सुगम संगीत, भजनसंध्येच्या माध्यमातून त्यांची ही लयबद्ध साधना चालते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या कौशल्याचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे.

नागपूर : संगीत क्षेत्रात आपल्या आगळ्यावेगळ्या कौशल्यासाठी सुपरिचित असलेले सुधीर कठाळे एकाहून एक दर्जेदार व्हिडिओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. कोरोनाचे युद्ध जिंकण्याचा संकल्प इतरांप्रमाणे त्यांनीही केला असून, वाद्यांचे आवाज तोंडाने काढून ते चाहत्यांना मनमुराद हसवत आहेत. 

मानेवाडा भागात राहणारे सुधीर कठाळे यांनी बाराव्या वर्षापासून संगीतज्ञ गिरीश वराडपांडे यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. ते उत्तम तबला व ढोलकीही वाजवतात. विशेष म्हणजे, वाद्य हाताने वाजविण्यात ते निपुण आहेतच, पण त्यांच्याकडे एक आगळीवेगळी कलादेखील आहे. सुधीर कठाळे तबला, ढोलकी, ड्रमसेट, ट्रिपल कांगड्रम, ऑक्‍टोपॅडचा अगदी हुबेहूब आवाज तोंडाने काढतात. त्यांनी तोंडाने वाजविलेल्या रिमिक्‍स रिदमचे तर असंख्य चाहते आहेत. 

सुराबर्डी येथील एका संस्थेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले सुधीर कठाळे फावल्या वेळेत संगीताची साधना करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. सुगम संगीत, भजनसंध्येच्या माध्यमातून त्यांची ही लयबद्ध साधना चालते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या कौशल्याचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यास गेले असता सुधीर कठाळे यांना तोंडाने वाद्यांचे आवाज काढून दाखवा, असे आग्रहाने सांगितले जाते. 

हेही वाचा : कॅन्सरग्रस्त चिमुकलीवर शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांचा खर्च; बाप झाला हतबल...मदतीचे आवाहन 

प्रारंभी सुधीर कठाळे वाद्यांचा विविध आवाज तोंडाने गुणगुणत असत. मात्र, चाहत्यांकडून दाद मिळत गेली अन्‌ ही कला असल्याचे सुधीर कठाळे यांच्या लक्षात येत गेले. त्यानंतर मात्र सुधीर कठाळे यांनी विविध वाद्यांचे आवाज नेमके कसे असतात. त्यांचे खाचखळगे कुठले, याचे बारीक निरीक्षण केले. त्या आवाजांचा नियमित रियाज केला आणि केवळ तबला किंवा ढोलकीपुरते सीमित न राहता विविध आवाज तोंडाने काढण्याचे कौशल्य त्यांनी स्वतःमध्ये निर्माण करून घेतले. मित्रपरिवाराकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच त्यांच्यातली कला बहरत गेली असल्याचे सुधीर कठाळे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makes the sound of various instrumets by mouth 

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: