पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूनं केला हल्ला तेवढ्यात मुलगी आली आडवी अन् घडली गंभीर घटना

अनिल कांबळे 
Thursday, 7 January 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रशेखर सरोदे (४२) हा पत्नी ट्वींकल (३५), मुलगी कोमल, दीक्षा आणि मुलगा यश यांच्यासोबत मातोश्रीनगर, वानाडोंगरीत राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे.

नागपूर ः पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने हल्ला करीत असताना मुलगी आडवी आली. त्यामुळे पत्नीऐवजी त्याने मुलीवर चाकूने हल्ला करीत जखमी केले. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता एमआयडीसीत घडली. कोमल चंद्रशेखर सरोदे (१२) असे जखमी मुलीचे नाव आहे. 

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रशेखर सरोदे (४२) हा पत्नी ट्वींकल (३५), मुलगी कोमल, दीक्षा आणि मुलगा यश यांच्यासोबत मातोश्रीनगर, वानाडोंगरीत राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी ट्वींकलच्या चारीत्र्यावर संशय घेतो. याच कारणावरून पत्नीला वारंवार मारहाण करीत होता. बुधवारी दुपारी ट्वींकल या मुलगी कोमलला घेऊन दवाखाण्यात घेल्या होत्या. त्यांना यायला उशिर झाला. त्यामुळे त्याने घरी असलेला मुलगा यश आणि दिक्षाला शिवीगाळ आणि मारहाण करणे सुरू केले.

दरम्यान ट्वींकल आणि कोमल घरी पोहचल्या. पतीने पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. घरातून चाकू आणून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दीक्षाच्या अंगावर चाकू घेऊन धावल्यामुळे मोठी मुलगी कोमलने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडून चंद्रशेखरने कोमलवर चाकूने हल्ला केला. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

कोमलच्या हनुवटीवर आणि हाताला  वार लागला. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर सरोदे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली. 

संपदान - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Attack on daughter and wife In Nagpur Latest Crime News