युवकाला पडले रातोरात श्रीमंत झाल्याचे स्वप्न; सकाळी कोंबडा आरवताच केला आत्महत्येचा प्रयत्न  

अनिल कांबळे 
Wednesday, 25 November 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू हा पेंटिंगचे काम करतो. गुरुवारी दुपारी रिंकू हा आईसोबत मोपेडने कोराडीला जात होता. बाबा फरिदनगरमधील पुलावर उलटी येत असल्याचे आईला सांगून रिंकू हा मोपेडवरून उतरला.

नागपूर : एका युवकाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, पुलावरून उडी घेतल्यामुळे युवकाचा पाय तुटला. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी झिंगाबाई टाकळीतील बाबा फरिदनगर येथे घडली. रिंकू दास (वय ३०, रा. लष्करीबाग) असे जखमी युवकाचे नाव आहे. पण त्यानं आत्महत्येचा प्रयत्न का केला? याची कथा रंजक आहे. रिंकू याला पडलेल्या स्वप्नामुळे  त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला अशी सूत्रांची माहिती आहे. 

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू हा पेंटिंगचे काम करतो. गुरुवारी दुपारी रिंकू हा आईसोबत मोपेडने कोराडीला जात होता. बाबा फरिदनगरमधील पुलावर उलटी येत असल्याचे आईला सांगून रिंकू हा मोपेडवरून उतरला. आईला काही कळायच्या आधीच रिंकू याने पुलावरून उडी घेतली. त्याच्या आईने आरडाओरड केली. नागरिक जमले.

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश ठाकरे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी रिंकू याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रिंकू याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तूर्त मानकापूर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा - आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण

स्वप्नामुळे केला आत्महत्येच प्रयत्न 

रिंकू खूप श्रीमंत झाला आहे. त्याच्याकडे अतोनात पैसे, महागडी कार, बंगला आहे. त्याच्याकडे खूप पैसे सोने, चांदी आहे असेही त्याने स्वप्नात पाहिले. श्रीमंतीच्या स्वप्नात रंगून गेलेला रिंकू स्वतःला करोडपती समजू लागला. मात्र तेवढ्यात कोंबडा आरवला आणि रिंकूची झोप उघडली. समोरचे चित्र बघून आपण स्वप्न बघत होतो हे त्याच्या लक्षात आले. मात्र ही श्रीमंती आपण कधीच मिळवू शकणार नाही असे म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.    

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man attempt to end his life because of one dream