एकमेकांबद्दल झाले गैरसमज अन् घडला मृत्यूचा थरार

अनिल कांबळे
Monday, 11 January 2021

निहाल व त्याचा पत्नीचा वाद सुरू आहे. त्याची पत्नी माहेरी गेली. बुधवारी ती सासरी परतणार होती. याबाबत माहिती देण्यासाठी निहाल, त्याची पत्नी व अन्य नातेवाइक अजनी पोलिस स्टेशनमध्ये आले.

नागपूर : जुन्या वादातून बापलेकाने गुन्हेगार तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. ही थरारक घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अजनीतील न्यू बालाजीनगर येथील राहुल मेन्स पार्लरमध्ये घडली. सुमित पुरुषोत्तम पिंगळे (वय २४, रा. चंद्रनगर), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी बापलेकाला अटक केली. 

हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

निहाल देवेंद्र जोशी (वय २७) व वडील देवेंद्र मंगरूजी जोशी (वय ५१, रा. न्यू बालाजीनगर), अशी आरोपींची नावे आहेत. सुमितविरुद्ध हत्येसह पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निहाल याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय असून, देवेंद्र सुरक्षारक्षक आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निहाल व त्याचा पत्नीचा वाद सुरू आहे. त्याची पत्नी माहेरी गेली. बुधवारी ती सासरी परतणार होती. याबाबत माहिती देण्यासाठी निहाल, त्याची पत्नी व अन्य नातेवाइक अजनी पोलिस स्टेशनमध्ये आले. याच वेळी सुमित याची १८ वर्षीय मैत्रीणही मोबाईल चोरी गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये आली. ओळखीचा असल्याने ती निहालसोबत बोलली.

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

सुमित याने मोबाईल चोरी केला, असे निहाल हा मैत्रिणीला सांगत असल्याचा संशय त्याला आला. त्यानंतर निहालही पोलिसांसोबत बोलला. निहाल हा पोलिसांना आपल्याबाबत टीप देत असल्याचा समजही सुमित याचा झाला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोन दिवसांपूर्वीही सुमित व निहालमध्ये वाद झाला होता. रविवारी दुपारी सुमित हा न्यू बालाजीनगरमधील राहुल जेन्ट्स पार्लर येथे कटिंग करायला आला. काही वेळात निहालही तेथे आला. दोघांमध्ये वाद झाला. निहालच्या मागोमाग त्याचे वडीलही तेथे आला. दोघांनी चाकू व रॉडने निहालवर वार केले. घटनास्थळीच सुमित याचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man murder in ajni area of nagpur crime news