बहीण जावयाचे आपल्या बायकोशी संबंध असल्याचा संशय अन्‌ स्वत:चे...

अनिल कांबळे
Monday, 27 January 2020

बहीण जावयाचे आपल्या बायकोशी अनैतिक संबंध असल्याचा संशय हरीशला होता. यावरून तो बायकोशी भांडण करीत होता. मैत्रीत साळा हरीश अडसर ठरत अल्यामुळे जावयाने खून केल्याची घटना काचीपुऱ्यात घडली.

नागपूर : बहीण जावायाचे आपल्या बायकोशी संबंध असल्याचा संशय हरीशला होता. यामुळे तो नेहमी बायकोशी भांडण करीत होता तसेच मारहाणही करीत होता. ही बाब तिने जावयाला सांगितली होती. संबंधात साळा हरीश अडसळ ठरत असल्यामुळे त्याचा जावयाने खून केला. ही घटना 25 डिसेंबरला काचीपुऱ्यात घडली होती. या हत्याकांडांत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रामानुज चित्रसेन पटेल (35, रा. काचीपुरा) व भोला उग्रसेन पटेल (42, रा. रिवा, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश पटेल (रा. काचीपुरा) याने आठ वर्षांपूर्वी योगेश पट्टा नावाच्या युवकाचा बहिणीश असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधावरून खून केला होता. या हत्याकांडात तो काही वर्षे कारागृहात होता. मात्र, यातून त्याची निर्दोष सुटला झाली होती. यानंतर त्याने शंकरनगर चौकात चायनीजचा हातठेला सुरू केला होता. जावाई रामानूज पटेल हा हरीशच्या वडीलाच्या दुकानात कामाला होता. 

अधिक वाचा - फक्‍त मीच दोषी आहे ना... मग आत्मदहनाची परवानगी द्या

हरीशच्या बहिणीशी त्याचे सूत जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. यावरून हरीश अनेक दिवस रामानूजवर चिडून होता. तसेच याच कारणावरून दोघांत वादही झाले होते. दोघांतील संबंध ताणतणावाचेच होते. तसेच दुसरा आरोपी भोला पटेल हा 15 वर्षांपूर्वी काचीपुऱ्यात राहात होता. सध्या तो मध्यप्रदेशातील रिवा येथे राहते. अधूनमधून तो काचीपुऱ्यातील चुलत भावांकडे राहायला येत असतो. मात्र, भोलाची वस्तीत दशहत असल्यामुळे हरीश त्याच्यावर चिडून होता. त्यामुळे भोलाला तो वस्तीत येण्यास मनाई करीत होता. काही दिवसांपूर्वीच हरीश हा भोलाच्या मागे चाकू घेऊन लागला होता. 

बायकोशी मैत्री खटकली

आपल्या बहिणीच्या नवऱ्याची बायकोशी असलेली मैत्री हरीशला खटकत होती. रामानूज आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय हरीशला होता. त्यामुळे तो रामानूजचा काटा काढण्याच्या मागे लागला होता. हरीशने बायकोशी अनेकदा रामानूजचे नाव घेत भांडणही केले होते. त्यामुळे तिने रामानूजला ही गोष्ट सांगितली होती. हरीश मैत्रीत अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याचा प्लान रामानूजने केला. 

सविस्तर वाचा - 'ते' सातजण दीड तासापासून ठेवत होते पाळत, मग...

असा रचला कट

रामानूजने भोलाची भेट घेतली. दोघांनी होत असलेला त्रासापासून सुटकार करण्यासाठी हरीशचा काटा काढण्याचा कट रचला. त्याची तीन दिवसांपासून रेकी केली. हरीश हा शनिवारी मध्यरात्रीनंतर दारू पिऊन घरी येत होता. त्याला घराजवळच गाठले. दोघांनी त्याच्या डोक्‍यात दगड घातला तर भोलाने चाकू गळ्यावर फिरवून खून केला. 

वडिलांनाच दिसला मृतदेह

शनिवारी पहाटे पाच वाजता रघुनाथ पटेल हे झोपेतून उठले आणि नेहमीप्रमाणे वॉकिंगसाठी जात होते. घरापासून काही अंतर दूर जाताच त्यांना एका युवकाचा मृतदेह रक्‍ताच्या थारोळ्यात दिसला. त्यांनी लगेच धाव घेतली. मृतदेह पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण, तो मृतदेह त्यांचा मुलगा हरीश याचा होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man murdered in Kachipura in Nagpur