
समाजमन सुन्न करणारी आणि मुर्दाड प्रशासनाला पुन्हा जागं करणारी एक हृदयद्रावक घटना आज नागपुरात घडली आहे. या प्रकारामुळे एका निष्पाप आणि होतकरू तरुणाला जीवाला मुकावं लागलं आहे.
नागपूर ः समाजमन सुन्न करणारी आणि मुर्दाड प्रशासनाला पुन्हा जागं करणारी एक हृदयद्रावक घटना आज नागपुरात घडली आहे. या प्रकारामुळे एका निष्पाप आणि होतकरू तरुणाला जीवाला मुकावं लागलं आहे.
नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्या गेल्याने २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी जाततरोडी परीसरात घडली. प्रणय प्रकाश ठाकरे (ज्ञानेश्वरनगर, मानेवाडा रोड) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या १० दिवसांतील मांजामुळे गेलेला तिसरा बळी आहे.
अधिक वाचा - झोपेतून उठताच दिसला नाही कर्ता पुरुष; चिठ्ठी सापडताच अंगाचा उडाला थरकाप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय ठाकरे हा मंगळवारी दुपारी वडीलासोबत वेगवेगळ्या दुचाकीने तहसीलमध्ये गेला होता. परत येत असताना प्रणय हा वडीलाच्या दुचाकीमागे आपली दुचाकी चालवित होता. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जाततरोडी चौकातून जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा गुंडाळला. त्याने दुचाकी थांबविली.
गळ्याभोवती गुंडाळलेल्या मांजा काढायला लागला. दरम्यान बाजुला जाणाऱ्या गाडीला तोच मांजा अडकला. त्यामुळे मांजा ताणल्या गेल्यामुळे गळ्याला घट्ट मांजा आवळल्या गेला. त्यामुळे प्रणयचा गळा कापला. लगेच रक्ताच्या चिरकांड्या गळ्यातून निघायला लागल्या. तो दुचाकीवरून खाली पडला. रस्त्यावरच रक्ताचा मोठा सडा पडला. त्याला नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच प्रणयचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद इमामवाडा पोलिसांनी केली.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
मांजाचा तिसरा बळी
उपराजधानीत गेल्या १० दिवसांत मांजामुळे गेलेला तिसरा बळी आहे. दाभा परिसरात सात वर्षीय मुलगा वंश विकास तिरपुडे हा कटलेली पतंग पकडण्याच्या नादात कारखाली चिरडल्या गेल्या होता. तर ६ जानेवारीला एंटा विनोद सोळंकी हा १२ वर्षीय मुलगा धावत्या रेल्वेखाली सापडून मृत पावला होता. तर आता प्रणय ठाकरे याचा बळी गेला. आदित्य नावाच्या विद्यार्थ्यचा गळा कापल्या गेला होता.
संपादन - अथर्व महांकाळ