बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, कसा साजरा करणार गुढीपाडवा?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

25 मार्चला गुढीपाडवा आहे. पाडव्यासाठी काठी, साखरगाठी, माळा, नवे वस्त्र, तांब्याचा चंबू यांची बाजारपेठ एक आठवडा आधीच गजबजते. यंदा मात्र कोरोनाचा परिणाम गुढीपाडव्याच्या बाजारपेठेवर प्रकर्षाने दिसून येत आहे. सध्या शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था यांना सरकारने सुटी जाहीर केली आहे.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक जीवनात सतर्कता बाळगली जात आहे. कोरोनाचा परिणाम सणासुदीचा उत्साह व बाजारपेठेवरही झाला आहे. पाच दिवसांवर आलेल्या गुढीपाडवा सणासाठी एरवी सजणारी बाजारपेठ शांत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या तोंडावर शहर लॉकडाउन केल्याने बाजारातील रस्त्यांवर नीरव शांतता आहे. 

25 मार्चला गुढीपाडवा आहे. पाडव्यासाठी काठी, साखरगाठी, माळा, नवे वस्त्र, तांब्याचा चंबू यांची बाजारपेठ एक आठवडा आधीच गजबजते. यंदा मात्र कोरोनाचा परिणाम गुढीपाडव्याच्या बाजारपेठेवर प्रकर्षाने दिसून येत आहे. सध्या शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था यांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे लोक घरातच आहेत. अत्यावश्‍यक कारणासाठीच बाहेर पडा, अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत. लोकही काळजीपोटी कारणाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. परिणामी शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये कमालीची शांतता दिसत आहे. गुढीपाडवा सणाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याचे चित्र सर्वत्र आहे.

31 मार्चपूर्वी बीएस-4 वाहनांची नोंदणी परिवहन विभागात करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीएस-4 वाहनाची 31 मार्चनंतर नोंदणी करण्यात येऊ नये, असे आदेश दिलेले आहेत. शहरातील वाहनविक्रीच्या संपूर्ण शोरूम बंद आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याचा मानस असलेल्यांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडणार आहे. कारण, शोरूममध्ये बुकिंग झालेल्या वाहनांची नोंदणीच परिवहन विभागात होणार नसल्याने त्यांना वाहन घरी नेता येणार नाही.

संचारबंदीतही केला आगाऊपणा, तुकाराम मुंढेंच्या आदेशाने या प्रतिष्ठानांवर कारवाई 

1 एप्रिलपासून बीएस-6 वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे बुकिंग केलेल्या वाहनांचे काय अथवा ते रद्द केल्यानंतर अधिक दराने बीएस-6 वाहने खरेदी करावी लागणार आहेत. त्याचा भुर्दंड ग्राहकांना पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: market closedown due to curfew