esakal | शहरातील ठाणेदार झाले 'अलर्ट'; रोलकॉवरच होते कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी.. डॉक्टरांचे समुपदेशनही
sakal

बोलून बातमी शोधा

medical checkup of police has done at every police station in nagpur

पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन कायदा व सुव्यवस्था राबवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

शहरातील ठाणेदार झाले 'अलर्ट'; रोलकॉवरच होते कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी.. डॉक्टरांचे समुपदेशनही

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : शहर पोलिस दलातील कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची वाढती संख्या पाहता आता ठाणेदारच ‘अलर्ट’ झाले आहेत. आपला कर्मचारी निरोगी आणि कोरोनापासून दूर राहावा म्हणून ठाणेदार गंभीर आहेत. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये ‘रोलकॉल’मध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केल्या जात आहे. तसेच डॉक्टरांनी सूचवलेली मेडीकल किट वितरित करण्यात येत आहे.

पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन कायदा व सुव्यवस्था राबवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याकरिता आता पोलीस ठाण्यांमध्ये दिवस व रात्रपाळीत रुजू होताना म्हणजे ‘रोलकॉल'च्या वेळीच पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या शरीराचे तापमान, शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजली जात आहे.

हेही वाचा - कंगणाला मिळालेली Y+ सुरक्षा असते तरी काय? Z+, Z, Y आणि X श्रेणीची सुरक्षा कुणाला कधी मिळते? वाचा

 शहर पोलिस दलातील कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पोहोचली टप्प्यात आहे. पोलिसांमध्ये मृत्यूचे प्रमाणही अधिक असून शहरातील रुग्णालये फुल्ल आहेत. त्यामुळे दलातील करोनाग्रस्तांना ऑक्सिजन मीटर, थर्मल स्कॅनर, मल्टीव्हीटॅमिनच्या गोळ्या आदींचा पुरवठा करण्यात येत आहे . लोकांची सुरक्षा करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, लोकांच्या घरांमधील भांडणे मिटवणे आणि व्हीआयपी बंदोबस्तामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्यायला कधी वेळ मिळत नाही. त्यामुळे एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी प्रत्येक ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य किट, ऑक्सीमिटर, औषधी वितरित केली आहे. 

रोज कर्मचाऱ्यांची तपासणी करणे सुरू केले आहे. तसेच शांतीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार के. बी. उईके यांनी एका पोलीस शिपायाचा करोनाने मृत्यू होताच सर्वांची चाचणी करून घेतली. त्यात १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना गृहविलगीकरणात आणि आवश्यक असलेल्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. तसेच नोकरीवर येताना प्रत्येकाच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी मोजण्याचा निर्णय घेतला. 

शरीराचे तापमान अधिक व ऑक्सिजन पातळी कमी दिसल्यास त्यांना ताबडतोब पोलीस रुग्णालयाशी संपर्क करून योग्य उपचार घेण्याचे आदेश देण्यात येतात. ही पद्धत सर्वच पोलीस ठाण्यात अंमलात आणल्यास पोलीस दलातील करोनाचा फैलाव नियंत्रणात आणता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस दलात कोरोनाचा अधिक शिरकाव होऊ नये म्हणून थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार गंभीर आहेत.

क्लिक करा - 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित

त्यांनी सर्व पोलिस उपायुक्त आणि ठाणदारांना सूचना दिल्या आहेत. सहआयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी कोरोनावर मात कशी करावी, याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन आणि समूपदेशन करणे सुरू केले आहे.


संपादन - अथर्व महांकाळ