मेडिकलमध्ये कोरोना संशयित गर्भवतींचा मृत्यू, प्रादुर्भावाची भीती

Medical Corona suspected pregnant deaths, fear of outbreaks
Medical Corona suspected pregnant deaths, fear of outbreaks

नागपूर : कोरोनाबाधित व्यक्तीचा सोमवारी मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर 24 तास उलटत नाही, तोच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल आठ महिन्यांच्या गर्भवती मातेचा कोरोनाच्या संशयाने मृत्यू झाला. या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली. कोरोना संशयित म्हणून मंगळवारी (ता.7) दुपारी कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले होते. घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले. नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गर्भवतीचा मृत्यू झाल्यामुळे मेडिकलचे प्रशासन हादरले आहे. मृत्यूचे नेमकं कारण काय असावे याचा शोध नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील अवघ्या वीस वर्षांची ही महिला होती. या गर्भवती महिलेवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. एका नातेवाइकाने दिलेल्या माहितीनुसार वॉर्ड क्रमांक 22 मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान कोरोना संशयित झाल्याची लक्षणं दिसू लागल्याने कोरोना संशयित वॉर्डात मंगळवारी स्त्री व प्रसूतीरोगशास्त्र विभागातील डॉक्‍टरांनी रेफर केले. संशयित वॉर्डात महिलेला आणल्यानंतर लगेच नमुने घेण्यात आले. तपासण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र, अहवाल येण्याआधीच महिलेचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यासाठी पाठवला. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता नमुन्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

भीतीचे वातावरण

महिलेच्या मृत्यूनंतर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यास अतिशय गंभीर स्थिती निर्माण होण्याची जोखीम मेडिकलमध्ये असणार आहे. वॉर्ड क्रमांक 22 मध्ये ही महिला काही दिवस उपचार घेत होती, अशी चर्चा यावेळी होती. यामुळे संपर्कातील अनेक गर्भवती माता, परिचारिका, महिला परिचर तसेच नातेवाईक होते. महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला.

खासगीतील एकाचा मृतदेह मेडिकलमध्ये

खासगी रुग्णालयात एक व्यक्ती दगावला आहे. यामुळे या व्यक्तीला कोरोना संशयित असे सांगण्यात आल्यामुळे या व्यक्तीचा मृतदेह मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. गर्भवती माता तसेच खासगीतील मृतकांचे कोरोना अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com