चॉकलेटचा बुके बघितला का? मीना गंभीर यांच्या कल्पनेला शहरवासीयांची पसंती

योगेश बरवड
Thursday, 22 October 2020

अधिक आकर्षक सजावटीसह ही भेट अविस्मरणीय केली जाऊ शकत असल्याचे त्यांना समजले. या संकल्पनेला उद्यमशीलतेची जोड देण्याचा निर्धार केला. काही वर्षांपूर्वी ‘मेल्टिंग मुव्हमेंट’ नावाने सुरू केलेल्या या व्यवसायाला सुरुवात केली. मीना यांच्या उत्पादनांची आता ऑर्डरनुसार घरी जाऊन डिलीवरी दिली जाते.

नागपूर : वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट तयार करण्याची मीना गंभीर यांची आवड. या आवडीला उद्यमशीलतेची जोड देत त्यांनी सणांमध्ये आपलेपणाचा गोडवा भरण्याचे कार्य केले. त्यांनी तयार केलेल्या विविध चव असलेल्या चॉकलेट बुकेंना नागपूरकरांनीही पसंतीची पावती दिली आहे.

पदवीधर असणाऱ्या मीना यांना चॉकलेट तयार करण्याची आवड. प्रारंभी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट तयार करून त्या वेळ घालवत. मात्र, नंतर याचे त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. त्यातून त्यांना चॉकलेटचे बुके तयार करण्याची कल्पना सुचली. सण-समारंभामध्ये इतरांना चॉकलेट किंवा सुका मेव्याचे डबे भेट देण्याची पद्धती आहे.

क्लिक करा - रस्त्यावरील झाडांच्या खोडाला का असतो पांढरा-लाल रंग? जाणून घ्या यामागचं महत्वाचं कारण

अधिक आकर्षक सजावटीसह ही भेट अविस्मरणीय केली जाऊ शकत असल्याचे त्यांना समजले. या संकल्पनेला उद्यमशीलतेची जोड देण्याचा निर्धार केला. काही वर्षांपूर्वी ‘मेल्टिंग मुव्हमेंट’ नावाने सुरू केलेल्या या व्यवसायाला सुरुवात केली. मीना यांच्या उत्पादनांची आता ऑर्डरनुसार घरी जाऊन डिलीवरी दिली जाते. अगदी शंभर रुपयांपासून ते तब्बल पाच हजारापर्यंतचे चॉकलेट त्या तयार करतात.

रोजगारही दिला

दिवाळी, दसरा, राखीला मीना यांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी मागणी असते. याशिवाय वाढदिवस, लग्न व अन्य सोहळ्यांसाठी बुक्यांची चांगलीच मागणी असते. वर्षभर मागणी असणारा व्यवसाय असल्याने त्यांनी तीन ते चार जणांना नियमित रोजगार दिला आहे. कुटुंबीयांकडूनही या कामात त्यांना मोलाची मदत मिळते.

अधिक माहितीसाठी - अर्थसंकल्पातून झलकेंचे तुकाराम मुंढे यांना फटके

गडकरी, फडणवीसांना आवडली चव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आवड लक्षात घेत त्यांच्या एका चाहत्याने मीना यांच्याकडून चॉकलेटचा बुके नेला. चॉकलेटच्या गोडवा आणि रचनेला गडकरींनी कौतुकाची पावती दिली. या बुकेसोबतचा फोटो मीना यांनी जपून ठेवला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या बुकेचे कौतुक केले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meena's chocolate bookies are popular among the people of the city