नेपाळच्या तरुणीवर उत्तर प्रदेशात बलात्कार; नागपुरात गुन्हा दाखल

अनिल कांबळे 
Sunday, 4 October 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये २२ वर्षीय तरुणी सोनिया (बदललेले नाव) कामाच्या शोधात नेपाळहून दिल्लीला आली. तेथून ती नोएडाला गेली. येथे एका इव्हेंट कंपनीत कामाला लागली.

नागपूर ः नोकरीच्या शोधात भारतात आलेल्या एका २२ वर्षीय नेपाळ देशातील तरूणीवर उत्तरप्रदेशात बलात्कार करण्यात आला. तिचे नग्न फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. जीव वाचविण्यासाठी भीतीपोटी ती युवती नागपुरातील मैत्रिणीकडे आली. तिच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी अत्याचारी युवक व त्याच्या मानलेल्या बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण जयपाल यादव (वय २५, रा. लखनौ) व सुफीयाना विश्वकर्मा (मूळ रा. नेपाळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये २२ वर्षीय तरुणी सोनिया (बदललेले नाव) कामाच्या शोधात नेपाळहून दिल्लीला आली. तेथून ती नोएडाला गेली. येथे एका इव्हेंट कंपनीत कामाला लागली. याचदरम्यान तिची अन्य एका नेपाळी तरुणीसोबत मैत्री झाली. २०१९ मध्ये पीडित तरुणी मैत्रिणीसह सूरत येथे गेली. येथे ती एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करु लागली. दरम्यान तिची सुफीयाना या तरूणीशी ओळख झाली. सुफीयानाने तिचा विश्वास संपादन केला. माझा मानलेला भाऊ प्रवीण दुबईत सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याचे तिने सांगितले. सोनियासोबत त्याचे व्हीडिओ कॉलद्वारे बोलणेही करुन दिले. 

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

प्रवीण याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. जानेवारी २०२०मध्ये सुफीयाना ही सोनियाला घेऊन लखनऊ येथे आली. वेळी सुफीयानाने तिच्याकडील दीड लाख रुपये व दोन मोबाइल घेतले. लॉकडाउनदरम्यान काम सुटल्याने सोनियाने सुफीयानाला पैशाची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार देत तिचा छळ सुरू केला. पीडित तरुणीने कशीबशी ही माहिती प्रवीण याच्यापर्यंत पोहोचवली. प्रवीण याने तिला लखनऊमधील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. 

तरुणी हॉटेलमध्ये गेली. तेथे राहायला लागली. दरम्यान दोन दिवसांनी प्रवीण लखनऊ येथे आला. हॉटेलात त्याने तरुणीवर बलात्कार केला. मोबाइलद्वारे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढले. याद्वारे प्रवीण हा तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. ‘उत्तर प्रदेश पोलिस मी सेट केले आहेत, ते माझे काहीच बिघडवू शकत नाही, तुला तक्रार करायची तर खुशाल कर, असे प्रवीण तिला म्हणाला. 

अधिक वाचा - "आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?

त्यानंतर तरुणीला धमक्या यायला सुरुवात झाली. तसेच प्रविणही अश्‍लील फोटा सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देत होता. सोनियाने नागपुरातील कोराडीत राहणाऱ्या मैत्रिणीला आपबिती सांगितली. मैत्रिणीने तिला नागपुरात बोलाविले. दोन दिवस तिला धीर दिला. त्यानंतर कोराडी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांनी प्रवीण व सुफीयानाविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: men misbehaved with girl from Nepal