जबरदस्त! भंगार विक्रीतून कोट्यवधींची कमाई

योगेश बरवड
Friday, 7 August 2020

संपूर्ण भारतातील व्यावसायिक या बोलीत भाग घेऊ शकतात. तसेच ते साहित्य विकत घेण्यात सक्षमही असतात.

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे नियमित प्रवासी रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाउनच्या झळा मालवाहतुकीलासुद्धा बसल्या असून रेल्वेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. दक्षिण पूर्व मध्‍य रेल्वेने वेळेचा सदुपयोग करीत पडून असलेल्या भंगाराची विल्हेवाट लावण्यावर भर दिला.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

भंगारामुळे रेल्वेची बरीच मोठी जागा गुंतून होती. उपयोगात नसलेले रूळ आणि साईडिंग्सचे प्रमाण फार मोठे होते. हे भंगार बऱ्याच काळापासून पडीत होते. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच परिवहनात घट असल्यामुळे भंगाराच्या माध्यमातून लिलाव केल्याने चांगले उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. 

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

दपूम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी साकेत रंजन म्हणाले की, दपूम रेल्वेतील संपूर्ण विभागाला भंगार मुक्त करण्याचा ध्येय ठेवण्यात आले आहे. भंगाराची विल्हेवाट लावल्यामुळे केवळ उत्पन्नच मिळते असे नाही तर त्याचे रिसायकलिंग केल्याने पर्यावरणासाठी ते सकारात्मक ठरते. सर्व प्रकारची लिलाव प्रक्रिया क्रिसद्वारे विकसित इंटीग्रेटेड रेल्वे ई- प्रोक्योरमेंट सिस्टमच्या (आयआरईपीएस) ई-लिलाव मॉड्यूलच्या माध्यमातून ऑनलाइन आयोजित केली जाते. ज्यामुळे संपूर्ण भारतातील व्यावसायिक या बोलीत भाग घेऊ शकतात. तसेच ते साहित्य विकत घेण्यात सक्षमही असतात. हे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय करता येते. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

कठोर लॉकडाउनच्या काळात संपूर्ण जगाचेच अर्थचक्र थांबले. या अडचणीच्या काळात दक्षिण पूर्व मध्‍य रेल्वेने ई-लिलावाच्या माध्यमातून निरुपयोगी भंगार विक्रीवर लक्ष केंद्रित केले. तब्बल ३४ कोटीत भंगाराची विक्री करीत दपूमरेने विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: millions earned from scrap sales