मंत्रिमहोदय, तुम्हीच सांगा, केव्हा होईल लागवड, केव्हा येईल फळ, का म्हणताहेत शेतकरी असे....

file
file

सावनेर (जि.नागपूर) : शासनातर्फे अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीचे प्रस्ताव तयार केले आहेत. लागवडीचा हंगाम तोंडावर आहे. मात्र, शासनातर्फे कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या योजनेला मंजुरी मिळाली नसल्याने फळबाग लागवडीसाठी उत्सुक असणारे शेतकरी आतुरतेने योजना सुरू होण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या लाभासाठी ही फळबाग योजना किंवा अशाच स्वरूपाच्या पर्यायी योजनेला शासनातर्फे मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य छायाताई बनसिंगे यांच्या पुढाकारात स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार सावनेर येथील दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन मागणी निवेदन देऊन चर्चा केली.
 
अधिक वाचा : अबब ! बिडीओंच्या निरोप सोहळयाला मंत्री, आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधी, काय झाले असे...

शासनाने मंजूरी द्यावी
तालुक्‍यात संत्रा, मोसंबी, निंबू, सीताफळ पिकांसाठी अनुकूल वातावरण असून कापूस पिकाला सक्षम व कायमस्वरूपी पर्याय म्हणून सिंचनक्षेत्र उपलब्ध असलेल्या शेतकऱ्याची फळबाग लागवडीकरिता मागणी असून, यामधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो. करिता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना किंवा पर्यायी स्वरूपाची फळबाग लागवड योजना शासनाने मंजूर करावी, जेणेकरून सावनेर तालुक्‍यातील कृषी विकासास चालना मिळेल. याविषयी काही शेतकऱ्यांनी मंत्रिमहोदयांना अवगत केले.

लागवडीसाठी शेतकरी गटांची उत्सुकता
तालुक्‍यात 300 हेक्‍टर जमिनीवर फळबाग लागवडीचे शेतकऱ्यांचे नियोजन असून, यासाठी शेतकरी
गटांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे. कोची या गावातील शेतकरी गटाने 125 एकर जमिनीवर फळबाग लागवडीचे नियोजन केले आहे. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड झाल्यास फळबाग लागवडीचे पलस्टर तयार होऊन शासनाच्या मदतीने हॉंर्टीनेट अंतर्गत फळपिके निर्यातीस चालना मिळेल, असे शेतकरी गटाचे म्हणणे आहे. सध्या खुबाळा येथील शेतकरी गटातर्फे निंबोळी अर्क, सेंद्रिय खत व भाजीपाला शेतीवर भर दिला जात आहे. नुकतीच येथील कृषी केंद्राला राज्याचे कृषिमंत्री व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तपेश्वर वैद्य आदींनी भेटी देऊन त्यांच्या उपक्रमाची स्तुती केली.

...तर शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल
पारंपरिक पिकांऐवजी फळबाग पिकांकडे शेतकरी वळलेत, तर त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. शेतात पिकांच्या योग्य लागवड, व्यवस्थापन व इतर समस्येचा सल्ला व मार्गदर्शनासाठी जून महिन्यात कृषी संजीवनी अभियानांतर्गत कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे.
-अश्विनी कोरे
तालुका कृषी अधिकारी, सावनेर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com