महिला म्हणते, या गावावर माझी मालकी, संपूर्ण गाव खाली करा...

पचखेडी :  याच गावावर कुणीतरी मालकीचा केला आहे.
पचखेडी : याच गावावर कुणीतरी मालकीचा केला आहे.

पचखेडी (जि.नागपूर) : कुही तालुक्‍यातील बानोर ग्रामपंचायतमध्ये एक अघटीत घडले. रिदोरा गावावर चक्‍क एक महिलेने हक्‍क सांगितल्यामुळे गावात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या महिलेने ग्रामस्थांना गाव खाली करण्यास सांगितल्यामुळे गावक-यांची झोपच उडाली आहे.

रिदोरा एक सुखीसंपन्न गाव
गेल्या 85 वर्षांपासून वसलेल्या रिदोरा गावात दहा कुटुंबांची वस्ती आहे. येथील वृद्ध व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्याकरिता स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही लढले. गावाचा विकास करत बानोर ग्रामपंचायतीने गावात रस्ते, वीज, पाण्याची सर्वपरीने उत्तम सुविधा करून दिल्याचे गावच्या सरपंच अनिता बदन सांगतात. असे असताना रिदोरा ग्रामस्थ कुशलमंगल पद्धतीने जीवन जगत होते. गावाच्या शेजारी असलेल्या शेताच्या मालकीण (रा.नागपूर) या महिलेने गावकऱ्यांना तर चक्‍क नोटीस पाठवून ही सर्व जागा "माझ्या मालकीची आहे'. संपूर्ण गाव आताच्या आता खाली करा, अशी धमकीही दिली. मात्र, गावकऱ्यांनी गावाची जागा आमच्या मालकीची आहे व आम्ही गाव कशासाठी खाली करायचे, असे विचारले असता त्या महिलेने गावकऱ्यांच्या विरोधात जागा आपली असल्याचा दावा करीत कोर्टात अपील केले व संपूर्ण गावकऱ्यांना नोटीस बजावली.

अधिक वाचा : (video)गुमगाववासीयांना आजही पावसाळयात सहन कराव्या लागतात या वेदना...

रिदारो येथील ग्रामस्थ संतापले

एकेकाळी85 वर्षांपासून गावाची ग्रामपंचायतीला नोंद आहे. ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पक्‍क्‍या घराचेही बांधकाम केले. सर्व बाबी पूर्ण असूनही कुणीही यावे व गावाची जागा माझी आहे, असे म्हणत गावावर कब्जा करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही ग्रामस्थांनी काय करावे, कुणाकडे जायचे, असा सवाल ग्रामस्थ ज्ञानेश्वर झलके, रेखा खराबे, राजू चौधरी, बंडू चौधरी, धोंडू चौधरी, पवन सहारे, मारोती भोयर, ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

जागा दुसऱ्याच्या मालकीची कशी?
तीन पिढ्यांपासून रिदोरा हे गाव स्वतंत्र गाव म्हणून ग्रामपंचायतीला व पंचायत विभागाला नमूद आहे. एवढे सर्व असूनदेखील ती जागा दुसऱ्याच्या मालकीची कशी आहे?
अनिता विष्णुदास बदन
सरपंच, बानोर

महिलेचा अधिकार नाही
सर्वे नंबर 1 व सर्वे नंबर 2 ही जागा शासकीय आबादी म्हणजेच गावठाणाकरिता आहे. सर्वे नंबर 3 ही जागा एका महिलेची आहे. त्यामुळे गावठाणाच्या जागेवर व महिलेचा कुठलाही अधिकार नाही.
अश्विनी लोखंडे
तलाठी, बानोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com