बेशुद्ध करून बलात्कार; कोल्ड्रिंकमध्ये टाकले गुंगीचे औषध

अनिल कांबळे
Tuesday, 27 October 2020

रात्रीच्या सुमारास कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषधी टाकून पिण्यास दिले. त्यामुळे गुंगी आल्याने ती झोपली. त्यानंतर आरोपीने पहाटेपर्यंत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. शुद्धवर येताच पीडितेने जाब विचारला असता त्याने लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर पुणे, कोराडी, सदर येथील हॉटेलसह कधी पीडितेच्या तर स्वत:च्या घरी नेऊन बलात्कार केला.

नागपूर : व्हॉट्सॲप ग्रुपमधून झालेल्या ओळखीतून चॅटिंग करीत जाळ्यात ओढल्यानंतर युवकाने प्रेयसीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध टाकून बलात्कार केला. तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर नात्यातील युवतीशी साखरपुडा केला. याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. सौरभ संतोष तिवारी (२७, रा. सातारा) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) हिने बीबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्या ती ब्युटीशियन म्हणून काम करते. वडिलांचे निधन झाले असून, आई आणि एका लहाण भावासह राहते. आरोपी हा औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीवर आहे.

अधिक वाचा - एकनाथरावांना सासुरवाडीतून कोण साथ देणार?

आरोपी आणि रिया दोघेही चौथ्या वर्गात सोबत शिकले आहेत. दरम्यानच्या काळात तो औरंगाबाद परिसरात खाजगी कंपनीत नोकरीला लागला. वर्ष २०१७ मध्ये जुन्या वर्ग मित्रांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमध्ये सौरभ हा सुद्धा होता. त्यामुळे दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले.

आधी चॅटिंग, नंतर मोबाईलवर दोघांचे तासनतास बोलणे व्हायचे. भेटीगाठीही वाढल्या. वर्ष २०१८ मध्ये सौरभ नोकरीनिमित्ता औरंगाबादला गेला. एकेदिवशी फोन करून तिला औरंगाबाद येथे फिरण्यासाठी बोलाविले. येथे तुझ्या राहण्यासाठी हॉटेल बूक करतो, असे म्हटल्याने रियाने होकार दिला. रिया औरंगाबादला गेली असता आरोपीने तिला हॉटेलऐवजी स्वत: राहत असलेल्या फ्लॅटवर नेले.

क्लिक करा - ह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू

रात्रीच्या सुमारास कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषधी टाकून पिण्यास दिले. त्यामुळे गुंगी आल्याने ती झोपली. त्यानंतर आरोपीने पहाटेपर्यंत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. शुद्धवर येताच पीडितेने जाब विचारला असता त्याने लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर पुणे, कोराडी, सदर येथील हॉटेलसह कधी पीडितेच्या तर स्वत:च्या घरी नेऊन बलात्कार केला. एवढेच नव्हे तर दुसऱ्या मुलीशी साक्षगंधही उरकले. त्यामुळे पीडितेने जरीपटका पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: molestation of a lover by making him unconscious