आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

हवामान खात्याने मोसमी पूर्व पाऊस असल्याचे सांगितले. तो शनिवारी दाखल होईल, असेही भाकित वर्तविले होते. ते खरे ठरले आहे. आता नागपूरकरांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आठवडाभरापासून अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दमट वातवारण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. 

नागपूर : पाऊस प्रत्येकाला हवा हवासा वाटतो... सामान्य नागरिक असो किंवा शेतकरी प्रत्येकालाच पावसाची प्रतीक्षा असते... पावसात भिजन्याचा आनंद वेगळाच... बळीराजा पावसासाठी काय काय नाही करतो... धान्य पिकवण्यासाठी पावसाची नितांत गरज असते... धरणात पाणी नसल्सास नागरिकांची मोठी पंचाईत होते... मात्र, पाऊस आता दाखल झाला आहे... परंतु, पावसाशिवाय... विश्‍वास बसेल ना... नाही... परंतु, हे खरं आहे... वाचा सविस्तर... 

दरवर्षी मॉन्सून कोकणमार्गे पूर्व विदर्भात दाखल होतो. यावेळीही मॉन्सूनने याच मार्गाने प्रवेश केला. मात्र, यावेळी अपेक्षेपेक्षा एक-दोन दिवस लवकर आगमन झाल्याने सुखद धक्‍काही दिला. गडचिरोली व इतर जिल्ह्यांमध्ये दणक्‍यात सलामी दिल्यानंतर शुक्रवारी नागपूर शहरातही सायंकाळी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र मॉन्सून दाखल झाल्याची चर्चा होती.

काय आहे या लिंकमध्ये? - बापरे! विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...

मात्र, हवामान खात्याने मोसमी पूर्व पाऊस असल्याचे सांगितले. तो शनिवारी दाखल होईल, असेही भाकित वर्तविले होते. ते खरे ठरले आहे. आता नागपूरकरांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आठवडाभरापासून अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दमट वातवारण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. 

विदर्भात साधारणपणे 15 जूनला मॉन्सूनचे आगमन होते. यापूर्वी 2018 मध्ये 8 जूनला, तर 2013 मध्ये 9 जून रोजी मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. विदर्भात मॉन्सून सक्रिय झाल्याने आता पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्‍यता आहे. शुक्रवारी विदर्भात मॉन्सून दाखल झाला होता. शुक्रवारी शहरात जोरदार वर्षाव करून आपण येत असल्याचे संकेत मॉन्सूनने दिले होते. प्रादेशिक हवामान विभागानेही मॉन्सूनच्या आगमनावर शिक्‍कामोर्तब केले.

अधिक माहितीसाठी - आश्चर्यम्! विजेशिवाय होतोय शेतात 24 तास पाणीपुरवठा...तो कसा? वाचा

हवामान विभागाचा इशारा ठरला फोल

हवामान विभागाने शनिवारी मॉन्सूनचा पाऊस येणार असल्याचे सांगितले होते. विदर्भात पाऊस आलाही. मात्र, काही प्रमाणात. दरवर्षी मॉन्सूनचा पाऊस ज्या प्रमाणे पडतो तसा तो आला नाही. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्याची पार निराशा झाली. 

विदर्भात दशकातील मॉन्सूनचे आगमन  
वर्ष तारीख
2019 22 जून
2018 8 जून
2017 16 जून
2016 18 जून
2015 13 जून
2014 19 जून
2013 9 जून
2012 17 जून 
2011 15 जून
2010 14 जून

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon enters Nagpur city without rain