कोरोनानंतर आता इंधन वाढीचा जबर फटका; महिलांचं बिघडलं आर्थिक गणित; कुटुंबात तणावही वाढला  

house wife
house wife

सावनेर (जि. नागपूर) :  कोरोनाच्या संकटाने सर्वांना एकमेकांपासून दूर केले आहे प्रत्येक जण कोरोचा संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत या संकटामुळे अनेकांचे वेतन रखडले कोणाचे कमी झाले अनेकांचा रोजगार हिरावला तर काहींचे उद्योगधंदे बुडाले अशा लोकांकडे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. 

कुणी उधार उसनवार घेऊन तर कुणी शिल्लक असलेल्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बऱ्याच वर्षापासून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली आहे त्यामुळे असे कुटुंब अगोदरच खर्चात काटकसर करून आपल्या संसाराचा गाडा कसेबसे पुढे ढकलीत आहेत.

यातच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती तीन महिन्यात झालेली घरगुती गॅस सिलेंडरची भरमसाठ वाढ यामुळे त्यांच्यावर सर्वच बाजूने महागाईची कुऱ्हाड कोसळल्याने सर्वसामान्य माणूस अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे कुटुंबात तणावही वाढला आहे. 

गॅस सिलेंडरच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे स्वयंपाक घरातील खर्चाचे गणित जुळवायचे कसे हा प्रश्न सर्वसामान्य घरातील कुटुंब प्रमुखाला सतावत आहे या वाढत्या दराचे चटके सामान्य गृहिणीलाही सहन करावे लागत आहे दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असून त्यामुळे सामान्य माणसाला जगणे कठीण होत चालले आहे.

 पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढलेले पाहायला मिळत आहे.डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना शेत कामासाठी ट्रॅक्टर किंवा डिझेल इंजिन वापरताना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. 

इंधन वाढीमुळे अनेक कुटुंबियांना ताणतणावात जीवन जगावे लागत आहे शेतकऱ्यांचाही आर्थिक बोजा वाढला आहे.
-संजय टेंभेकर 
शेतकरी उमरी

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com