esakal | एमपीएससी परीक्षा : असे बदला केंद्र; उद्यापासून सुरू होतोय पर्याय, १५ हजार उमेदवारांना मिळणार दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC candidates are allowed to change centers

सध्याचे प्रवासाचे व वास्तव्याचे निर्बंध लक्षात घेता अशा उमेदवारांना आयोगामार्फत रविवार २० सप्टेंबर रोजी आयोजित परीक्षेसाठी परत येणे अशक्य आहे. त्यामुळे पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांचया महसुली मुख्यालयाच्या म्हणजे विभागीय केंद्रात मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

एमपीएससी परीक्षा : असे बदला केंद्र; उद्यापासून सुरू होतोय पर्याय, १५ हजार उमेदवारांना मिळणार दिलासा

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर २०२० रोजी होणाऱ्या विविध पदांसाठीच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांना केंद्र बदलण्याची मुभा देण्याचा आदेश एमपीएससीने काढला आहे. पुणे हे परीक्षा केंद्र निवडले असेल त्यांना आता त्यांच्या नजीकच्या विभागीय परीक्षा केंद्राची निवड करता येणार आहे. १७ ते १९ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर उमेदवरांना त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधींकडून आयोगाकडे विविध माध्यमातून सातत्याने करण्यात येत होती. खेड्यातील गरीब व होतकरू उमेदवार, दुर्गम भागातील उमेदवारांना सध्याच्या परिस्थिीमध्ये अन्य जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर परीक्षसाठी उपस्थित राहण्याच्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

क्लिक करा - अगोदर चाकूने वार, दगडाने ठेचून खून नंतर जंगलात पुलाच्या पाईपमध्ये लपविला मृतदेह, पुढे...

टाळेबंदीच्या आधी पुणे शहरात आयोगाच्या विविध परीक्षांसाठी मोठ्या संख्येने पुणे विभागाबाहेरील उमेदवार अभ्यासासाठी वास्तव करीत होते. कोरोनामुळे ते आता त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे सध्याचे प्रवासाचे व वास्तव्याचे निर्बंध लक्षात घेता अशा उमेदवारांना आयोगामार्फत रविवार २० सप्टेंबर रोजी आयोजित परीक्षेसाठी परत येणे अशक्य आहे. त्यामुळे पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांचया महसुली मुख्यालयाच्या म्हणजे विभागीय केंद्रात मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

१५ हजार उमेदवारांना दिलासा

पुणे केंद्रावर परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या राज्यातील जवळपास १५ हजार उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. सतीश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा करीत ही मागणी केली होती.

ठळक बातमी - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

अडचणी कायमच

पुणे जिल्ह्याामध्ये एमपीएससीची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राहतात. पुणे केंद्रातील परीक्षार्थींच्या जागा पूर्ण झाल्यास नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडतात. असे पाच हजारांहून विद्यार्थी असून ते त्यांच्या स्वगृही आहेत. मात्र, त्यांना अशी मुभा मिळणार नसल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण होणार असल्याची माहिती स्टुडंट राइट असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोराम यांनी दिली.

go to top