MPSC BREAKING : जिल्हाबंदी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष; केली ही मागणी...

For MPSC students want examination centre at district level
For MPSC students want examination centre at district level
Updated on

नागपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर २०२० रोजी विविध पदांसाठी परीक्षा होणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी आपापल्या जिल्ह्यातच अडकल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्र बदलण्याची मुभा देण्याचा आदेश एमपीएससीने काढला आहे. मात्र, राज्यात टाळेबंदी असल्याने जिल्हाबंदी असल्याने विभागातही विद्यार्थ्यांना जाता येणार नसल्याने या निर्णयावर विद्यार्थी नाराज असल्याचे चित्र आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर उमेदवरांना त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधींकडून आयोगाकडे विविध माध्यमाततून सातत्याने करण्यात येत होती. खेड्यातील गरीब व होतकरू उमेदवार, दुर्गम भागातील उमेदवारांना सध्याच्या परिस्थिीमध्ये अन्य जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याच्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता.

यासाठी काही विद्यार्थी संघटनांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावरून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. सतीश गवई यांच्याशी चर्चा करीत विभागनिहाय केंद्र देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्यात टाळेबंदी असल्याने जिल्हानिहाय बंदी घालण्यात आली आहे. यामुळे बस आणि इतर वाहतूक सेवा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना विभागातील केंद्रावर पोहोचने अशक्य आहे.

दुसरीकडे पुणे जिल्ह्याामध्ये एमपीएससीची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राहतात. पुणे केंद्रातील परीक्षार्थींच्या जागा पूर्ण झाल्यास नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडतात. असे हजारो विद्यार्थी असून ते त्यांच्या स्वगृही आहेत. मात्र, त्यांना अशी मुभा मिळणार नसल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यातूनच विद्यार्थ्यांकडून आता जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र देण्याची मागणी करण्यात येत आहे.

परीक्षेसाठी परत येणे अशक्य

टाळेबंदीच्या आधी पुणे शहरात आयोगाच्या विविध परीक्षांसाठी मोठ्या संख्येने पुणे विभागाबाहेरील उमेदवार अभ्यासासाठी वास्तव करीत होते. कोरोनामुळे ते आता त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे सध्याचे प्रवासाचे व वास्तव्याचे निर्बंध लक्षात घेता अशा उमेदवारांना आयोगामार्फत रविवार २० सप्टेंबर रोजी आयोजित परीक्षेसाठी परत येणे अशक्य आहे. त्यामुळे पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली मुख्यालयाच्या म्हणजे विभागीय केंद्रात मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

विद्यार्थ्यांकडून नवीन मागणी

पुणे जिल्ह्याामध्ये एमपीएससीची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राहतात. पुणे केंद्रातील परीक्षार्थींच्या जागा पूर्ण झाल्यास नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडतात. असे पाच हजारांहून विद्यार्थी असून ते त्यांच्या स्वगृही आहेत. मात्र, त्यांना अशी मुभा मिळणार नसल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण होणार असल्याची माहिती स्टुडंट राइट असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोराम यांनी दिली. आता विद्यार्थ्यांकडून नवीन मागणी होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com