कारागृहातून सुटला अन् थेट मित्राच्या आईचा चिरला गळा... हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

काही वर्षांपूर्वी त्याच्या आईने आत्महत्या केली असून वडील वेगळे राहतात. ते गोटाफोडे याला घरी येऊ देत नव्हते. त्यामुळे चार दिवसांपासून तो भटकत होता. त्याला मदतीची गरज होती. मदत मिळवण्यासाठी तो शालेय जीवनातील मित्र नवीन मुळे याला भेटण्यासाठी शनिवारी सकाळी 10 वाजता त्याच्या घरी गेला. पण, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन व करोनाच्या भीतीने नवीनच्या आईने गोटाफोडे याला भेटण्यास मनाई केली.

नागपूर : पोलिस दलातील क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचा चारच दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या कैद्याने चाकूने भोसकून खून केला, तर मुलावर प्राणघातक हल्ला केला. हा थरार शनिवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आला. सुशिला अशोक मुळे (वय 52, रा. नंदनवन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा नवीन अशोक मुळे (30) हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर नवीन सुरेश गोटाफोडे (30, रा. देशपांडे ले-आऊट) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात आरोपी नवीन गोटाफोडे याने 31 डिसेंबर 2017 मध्ये खून केला होता. त्या गुन्ह्यात तो जामिनावर कारागृहाबाहेर आल्यानंतर दुचाकी चोरीमध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कारागृहात होता. दरम्यान, देशात करोनाची साथ असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायप्रविष्ठ कैद्यांना राज्य सरकारने पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांपूर्वी गोटाफोडे हा कारागृहाबाहेर आला.

मुलावरही प्राणघातक हल्ला 
दरम्यान, काही वर्षांपूर्वी त्याच्या आईने आत्महत्या केली असून वडील वेगळे राहतात. ते गोटाफोडे याला घरी येऊ देत नव्हते. त्यामुळे चार दिवसांपासून तो भटकत होता. त्याला मदतीची गरज होती. मदत मिळवण्यासाठी तो शालेय जीवनातील मित्र नवीन मुळे याला भेटण्यासाठी शनिवारी सकाळी 10 वाजता त्याच्या घरी गेला. पण, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन व करोनाच्या भीतीने नवीनच्या आईने गोटाफोडे याला भेटण्यास मनाई केली. याचा राग त्याला आला. त्यानंतर सुशीला या स्वयंपाकघरात कामात व्यस्त झाल्या. त्यावेळी आरोपी घरात शिरला व त्याने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली असता नवीनने धाव घेतली.

सायकलने गाठले शंभर किलोमीटर अंतर अन् मध्येच चेन तुटते मग....!

दगम्यान, आरोपीने नवीनवरही हल्ला केला व पळून गेला. यात नवीनच्या हाताला दुखापत झाली. परिसरातील लोक मदतीसाठी धावले व सुशीला यांना उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. नवीन मुळे याच्या तक्रारीवरून खून व खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी "सकाळ'ला दिली. 

वाईट संगतीने केला घात 
नवीन मुळे आणि नवीन गोटाफोडे हे दोघेही पाचवी ते दहावीपर्यंत एका नामांकित शाळेत शिकत होते. दहावीत असताना गोटाफोडेच्या आईने आत्महत्या केली. तेव्हापासून तो वाईट संगतीला लागला. दोघांचीही मैत्री कायम होती. गोटाफोडेला दारू, गांजा, अंमली पदार्थाचे व्यसन जडले. तरीही मुळेने त्याच्याशी मैत्री ठेवली होती. त्याच मैत्रीणे त्याचा घात केला. 
 
शेजाऱ्यांच्या प्रयत्नामुळे वाचला नवीन 
आरोपी गोटाफोडे हा मुळे यांच्या घरी आला. त्याने काही क्षणातच गोटाफोडेने सुशीला यांच्यावर हल्ला केला. नवीनने आईला वाचविण्यासाठी धाव घेत मदतीसाठी आरडाओरड केली. लगेच शेजारी राहणारा युवक मदतीसाठी धावला. त्यावेळी गोटाफोडे हा नवीनच्या छातीवर बसून चाकूने हल्ला करीत होता. दरम्यान, युवकाने आरोपीवर झडप घातली. त्यामुळे नवीन थोडक्‍यात वाचला, अशी माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of friend's wife nagpur