esakal | दुचाकीला बांधून तरुणाचा मृतदेह फेकला विहिरीत; प्रेमप्रकरणाचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of a young man, body thrown into a well

बंटी मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान अॅक्टिवा क्रमांक एम एच 40 - S -5634 ने घरून निघून गेला. त्यानंतर त्याने सायंकाळी त्याचा लहान भाऊ लोकेश श्यामराव चिडाम याला आपले लाइव्ह लोकेशन व्हाट्स अॅपच्या माध्यमातून पाठविले. 

दुचाकीला बांधून तरुणाचा मृतदेह फेकला विहिरीत; प्रेमप्रकरणाचा संशय

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीतील सुकळी गुपचूप येथील बंटी शामराव चिडाम (24) या तरुणाचा मंगळवारी रात्री खून करण्यात आला. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंटी मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान अॅक्टिवा क्रमांक एम एच 40 - S -5634 ने घरून निघून गेला. त्यानंतर त्याने सायंकाळी त्याचा लहान भाऊ लोकेश श्यामराव चिडाम याला आपले लाइव्ह लोकेशन व्हाट्स अॅपच्या माध्यमातून पाठविले. 

नातेवाईकांना चिंता वाटू लागल्याने त्यांनी उशिरा रात्रीपर्यंत गुमगाव ते महालक्ष्मी लॉनच्या परिसरात मिळालेल्या लोकेशननुसार बंटीचा शोध घेतला. याच परिसरामध्ये कपाशीच्या पिकाच्या ओळींमधून काहीतरी फरफटत नेल्याच्या खूणा आढळून आल्या. बुधवारी सकाळी या फरफटत नेलेल्या खुणांचा मागोवा घेत नातेवाईक, गावकरी व हिंगणा पोलिस अरुण शंभरकर यांच्या शेतातील विहिरीपर्यंत पोचले.

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ
 

विहिरीमध्ये बंटीचा मृतदेह व अॅक्टिवा गाडी आढळून आली. आरोपींनी बंटीला मारहाण करून ठार मारले व त्याचा मृतदेह ऍक्टिवा गाडीला दोराने बांधून विहिरीत फेकून दिला. हिंगणा पोलिसांनी अधिक तपास केला असता बंटीचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचा  संशय आहे. हाच संशयाचा धागा पकडून हिंगणा पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. 

अवघ्या आठ तासांत आरोपी धीरज झलके (वय  23) रा. सुकळी गुपचूप यास हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेऊन जेरबंद केले. इतर आरोपीना अद्याप अटक झालेले नाही. हिंगणा पोलिसांनी फिर्यादी मेघराज शालीक चिडाम, रा. सुकळी गुपचूप यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भादवि 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून, बंटीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे पाठविला आहे. 

संपादन  : अतुल मांगे