दारू घेतली, चकनाही होता सोबत; मात्र, नाही झाली पाण्याची सोय; पाण्यासाठी घडला पुढील थरार

सतीश डहाट
Sunday, 10 January 2021

गंभीर अवस्थेत कुंदन रस्त्यातच बराच वेळ पडून राहिला. मित्र अब्दुल जब्बार अब्दुल गफार याला माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याची गंभीर अवस्था पाहून जवळपास असलेल्या नागरिकांच्या त्याला उचलून येथील एका खाजगी रुग्णालयात नेले.

कामठी (जि. नागपूर) : जुन्या वादावरून उद्भवलेल्या भांडणात दोन आरोपींनी एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कामठी रेल्वे स्टेशनजवळील बालसदन अनाथालयासमोर घडली. मृताचे नाव कुंदन देवाजी रंगारी (४०, रा. चित्तरंजनदासनगर, कामठी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन हा अवैध चिल्लर दारूचा व्यवसाय करायचा. कुंदन हा शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घरी जात असताना मित्र करण शंकर वानखेडे व रूपेश उर्फ पैरमुंडी राजू लारोकर हे बाहेरून दारूची बाटली घेऊन आले. कुंदनला दारू पिण्यासाठी पाणी मागितले. परंतु, कुंदनने पाणी देण्यास मनाई करून त्यांना अपमानित केले व तेथून हाकलून लावले.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

ही बाब मनात ठेऊन दोन्ही आरोपींनी कुंदनचा काटा काढण्याचे ठरवले. तो कुठे कुठे जातो, याची माहिती या दोघांनी घेतली. कुंदन पहाटे सहा वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकाजवळ चहा पिण्यासाठी येताना त्यांना दिसला. त्याच वेळी करण व रूपेश ऊर्फ टट्ट्या ऊर्फ पैरमुंडी याने बालसदन अनाथालयासमोर त्याला गाठले. त्याच्यावर चाकूचे सपासप वार करून गंभीर जखमी केले व दोघेही घटनास्थळावरून पळून गेले.

गंभीर अवस्थेत कुंदन रस्त्यातच बराच वेळ पडून राहिला. मित्र अब्दुल जब्बार अब्दुल गफार याला माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याची गंभीर अवस्था पाहून जवळपास असलेल्या नागरिकांच्या त्याला उचलून येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. तेथे त्याला योग्य तो उपचार न मिळाल्याने तेथून हलवून स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जाणून घ्या - तब्बल १५ वर्षांनी झालं तिसऱ्या पाहुण्याचं आगमन अन् रात्री एका क्षणात कोसळला दुःखाचा डोंगर

पण वाटेतच कुंदन मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचे प्रकरण दाखल करून तपास सुरू केला. मृत कुंदनला पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth over an argument over alcohol murder marathi news