नाग नदी पुनरुज्जीवन प्रस्तावाचे कितीवेळा होणार पुनरुज्जीवन? प्रकल्पाच्या किमतीतही वाढ

nag river renovation proposal will come again in nagpur municipal corporation
nag river renovation proposal will come again in nagpur municipal corporation
Updated on

नागपूर : आतापर्यंत नाग नदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सभेत किती वेळा आला या प्रश्नाचे उत्तर नगरसेवकही आता निश्चितपणे देऊ शकणार नाही. परंतु, अद्यापही प्रकल्पाला सुरुवात झाली नाही. आता या प्रकल्पाच्या निमित्ताने काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा सभागृहात प्रस्ताव येणार आहे. दरम्यान पुनरुज्जीवनाच्या साडेबाराशे कोटींचा प्रकल्पासाठी आता दोन हजार ११७ कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे जवळपास साडेआठशे कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढल्याचे दिसून येत आहे. 

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे दिल्लीत बैठक झाली. यापूर्वी केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी साडेबाराशे कोटींच्या खर्चाला मान्यता दिली होती. आता पुढील पंधरा दिवसांत वित्त विभाग सचिव या प्रकल्पाला वित्तीय मान्यता देतील. याबाबत जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी निर्देश दिले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच सुरू होईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज व्यक्त केला. राष्ट्र नदी विकास प्राधीकरण महिन्याभरात या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करणार आहे. सल्लागार कंपनीने तयार केलेला प्रस्ताव जपानची वित्तीय संस्था जिकाकडे तपासणीसाठी देण्यात येईल. जिकाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. यापूर्वी नाग नदीचा प्रस्ताव अनेकदा सभागृहात मंजुरीसाठी आला होता. प्रत्येक वेळेला मंजुरीही देण्यात आली. 

किंमत वाढल्यास महापालिकेवर भार - 
जपानची वित्तीय संस्था जिका या प्रकल्पासाठी १ हजार ८६४ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे. प्रकल्पाची किंमत वाढल्यास महापालिकेला खर्च वहन करावा लागेल, असे जिकाने स्पष्ट केले असल्याचे महापौर तिवारी यांनी सांगितले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com