esakal | बाबासाहेबांच्या इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद थंडबस्त्यात, विविध राज्यातील प्रादेशिक भाषेत खंड प्रकाशित

बोलून बातमी शोधा

government has not published marathi translation of babasaheb original english literature of 1 to 6 volume

महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य मराठी भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ४५ वर्षांपूर्वी १५ मार्च १९७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली.

बाबासाहेबांच्या इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद थंडबस्त्यात, विविध राज्यातील प्रादेशिक भाषेत खंड प्रकाशित
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध विषयांवरील मूळ इंग्रजी साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केले. परंतु, बाबासाहेबांच्या मूळ इंग्रजी साहित्य १ ते ६ खंडाच्या मराठी अनुवादाचा एकही ग्रंथ शासनाने प्रकाशित केला नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस सरकारने बाबासाहेबांच्या जंयतीवर १२५ कोटी खर्च केले. मात्र, बाबासाहेबांच्या चरित्र साधने समितीमार्फत एकही खंड प्रकाशित केला नाही. 

हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी...

महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य मराठी भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ४५ वर्षांपूर्वी १५ मार्च १९७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. विशेष कार्य अधिकारी म्हणून वसंत वामन मून यांची निवड केली. मून यांनी निष्ठेने बाबासाहेबांच्या लेखनाचे, भाषणांचे देशविदेशातील संशोधन संकलित केले. शेवटचा श्‍वास घेईपर्यंत त्यांच्या कारकिर्दीत १७ खंड प्रकाशित झाले. पुढील ५ खंड होतील एवढे साहित्य संपादित करून ठेवले होते. बाबासाहेबांचे विविध विषयांवरील समस्यांवर लेखन व भाषणांचे संकलन ग्रंथबद्ध करून खंडरूपात महाराष्ट्र शासनाकरवी प्रकाशित करून मून यांनी जगासमोर आणले. विशेष असे की, बाबासाहेबांच्या इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यासंदर्भातील मंत्रिमंडळाचा निर्णय मून यांनी समितीवर असतानाच झाला होता. मात्र, मून यांचे निधन झाले. त्यानंतर आलेले सदस्य सचिव प्रा. हरी नरके, प्रा. दत्ता भगत, प्रा. अविनाश डोळस यांना बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला न्याय देता आला नाही. 

हेही वाचा - सामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव

नवीन समितीची स्थापना कधी? 
२०१४ नंतर फडणवीस सरकार सत्तेवर आले आणि चरित्र साधने प्रकाशन समितीचे काम थांबले. विद्यमान शासनाने समिती बरखास्त केली. परंतु, नवीन समिती अद्याप स्थापन केली नसल्याचे उघड झाले. विशेष असे की, महाराष्ट्राच्या तुलनेत देशातील इतर नऊ राज्यांनी बाबासाहेबांच्या मूळ इंग्रजी साहित्याचे प्रादेशिक भाषेत (अनुवादाचे) विविध खंड प्रकाशित केले. 

बाबासाहेबांच्या साहित्याचे प्रादेशिक भाषेतील खंड - 

  • हिंदी भाषेतील साहित्याचा २१ वा खंड प्रकाशित 
  • हिंदी भाषेतील २२ ते २५ क्रमांकाचे खंड प्रकाशित 
  • पंजाबी भाषेत ७ खंड प्रकाशित 
  • ओरिया भाषेत १४ खंड प्रकाशित, 
  • गुजराती भाषेतील २० खंड प्रकाशित 
  • मल्याळम भाषेतील १९ खंड प्रकाशित 
  • तमीळ भाषेतील ३७ खंड प्रकाशित 
  • बंगाली भाषेतील २६ खंड प्रकाशित 
  • तेलगू भाषेतील २५ खंड प्रकाशित 
  • कन्नड भाषेतील २१ खंड प्रकाशित 

देशात नऊ प्रादेशिक भाषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या मूळ इंग्रजी खंडाच्या १ ते ६ खंडाचा मराठी अनुवाद पूर्ण झाला आहे. परंतु, मराठी भाषेत एकही अनुवादित खंड प्रकाशित झाला नाही. विशेष असे की, नव्याने डॉ.आंबेडकर चरित्र साधने समिती गठित करण्यात आली नाही. 
-प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर, नागपूर