esakal | तुकाराम मुंढे इम्पॅक्‍ट : नागपूर झोनबाबतचा संभ्रम दूर, सरकारने काढला नवीन आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur city in red zone

स्टॅन्डअलोन स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ही प्रतिष्ठाने फक्त सकाळी 7 ते रात्री 7 या वेळेत सुरू राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, कॅब आणि टॅक्‍सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही. 

तुकाराम मुंढे इम्पॅक्‍ट : नागपूर झोनबाबतचा संभ्रम दूर, सरकारने काढला नवीन आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनबाबत सरकारने नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश 22 मेपासून अमलात येणार आहेत. या आदेशामुळे मॉल्स, मार्केट लॉकडाउन असेपर्यंत बंद राहणार आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोनसंबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. 

नवीन आदेशानुसार खासगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्‍सी सेवा बंद राहणार आहे. केवळ एका ओळीत जीवनावश्‍यक सेवेशी संबंधित दुकाने वगळता जास्तीत जास्त पाच दुकाने सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे. शासनाने 19 मे रोजी काढलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र, शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती.

क्लिक करा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी; नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

गुरुवारी रात्री उशिरा काढण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शहरात खासगी कार्यालये बंद राहणार असून, अत्यावश्‍यक सेवेशी संबंधित शासकीय/निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालये केवळ 5 टक्के कर्मचारी क्षमतेसहच तसेच जास्ती दहा कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहणार आहेत. 

यापूर्वी 17 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार इलेक्‍ट्रिक सामग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अपलायन्सेस दुरुस्ती, ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑइल आणि लुब्रिकेंट्‌स शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी कापड दुकानांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, आता यामध्ये बदल होणार आहे. दिवसाचे वर्गीकरण हटविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी - पत्नी बनली रणचंडिका; पतीच्या प्रेयसीला धु..धु धुतले... वाचा काय झाले ते

स्टॅन्डअलोन स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ही प्रतिष्ठाने फक्त सकाळी 7 ते रात्री 7 या वेळेत सुरू राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, कॅब आणि टॅक्‍सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही. 

'नाइट कर्फ्यू'

शहरात सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजतापर्यंत "नाइट कर्फ्यू' राहणार आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे. आयुक्त मुंढे यांनी नाइट कर्फ्यूच्या काटेकोर पालनासंबंधी पोलिस प्रशासनालाही आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिस विभागामार्फत कारवाई होणार आहे. 

प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता नाही

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवेला परवानगी देण्यात आली नाही. प्रतिबंधित क्षेत्रामधून कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरीला व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.