अनोखा विक्रम, कुटुंबासह पोहून पार केले 16 किलोमीटरचे अंतर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पोलिस शिपाई सुखदेव धुर्वे यांनी कुटूंबासह मुंबईच्या सागराची एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया असे 16 किलोमीटरचे सागरी अंतर 4 तास 50 मिनीटात पूर्ण केले. 
या कामगिरीची नोंद एशियन बूक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. याबद्दल पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 50 हजार रुपयांचा पुरस्कार देऊन धुर्वे यांचा सत्कार केला. 

नागपूर : आजवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रमांच्या बातम्या ऐकल्या व वाचल्या असतील. कुणी सलग गाण्याचा विक्रम करतो तर कुणी अनेक तास नाचण्याचा विक्रम करतो. यापैकी बहुतांश विक्रम एकट्या व्यक्तीने केलेले आहेत. मात्र कुटुंबासह एखादा विक्रम केल्याचे क्वचितच कानावर आले असेल. असाच एक विक्रम नागपुरातील एका पोलिसाने केला आहे.

पोलिस शिपाई सुखदेव धुर्वे यांनी कुटूंबासह मुंबईच्या सागराची एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया असे 16 किलोमीटरचे सागरी अंतर 4 तास 50 मिनीटात पूर्ण केले. 
या कामगिरीची नोंद एशियन बूक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. याबद्दल पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 50 हजार रुपयांचा पुरस्कार देऊन धुर्वे यांचा सत्कार केला. 

पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी धुर्वे यांनी विक्रमी साहस केले ते वाखाणण्याजोगे असल्याचे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी सुखदेव धुर्वे यांनी जिब्राल्टर खाडी, मुंबई येथील धरमतर ते गेटे वे ऑफ इंडिया, रेवस ते गेट वे ऑफ इंडिया, मोरा ते गेट वे ऑफ इंडिया अशा विविध सागरी अभियानात भाग घेतला आहे.

विदर्भ मुलांचा संघ करणार आणखी एक विक्रम 

जलतरणपटू धुर्वेचा सत्कार
या यशाबद्दल सहपोलिस आयुक्त रविंद्र कदम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, पोलिस उपआयुक्त गजानन राजमाने, पोलीस उपआयुक्त विक्रम साळी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांनी धुर्वे यांचे अभिनंदन केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur cop registered in asian book of record