नागपुरातील संशयितांच्या संख्येत घट, पहिला रुग्ण लवकरच घरी जाणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

बुधवारी मेडिकल आणि मेयोतील संशयितांचा आकडा कमी आढळून आला आहे. दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवतांना योग्य काळजी घेत असल्याचे निदर्शनास आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात आली असल्याचेही दिसून आले.

नागपूर : मेडिकल आणि मेयोतील योग्य नियोजनामुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात काहीसे यश येत आहे. 
नागपुरातील दैनंदिन संशयितांच्या संख्येत घट नोंदविण्यात आली आहे. तसेच ११ मार्च रोजी दाखल झालेल्या पहिल्या रुग्णाच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असून तो लवकरच घरी जाणार आहे. 

बुधवारी (ता.25) मेडिकलमध्ये तीन तर मेयोत सात कोरोना संशयितांना भरती करण्यात आले आहे. विशेष असे की, 9 मार्च रोजी पुण्यात पहिले कोरोना बाधित दाम्पत्य दाखल झाले होते. ते बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर नागपुरात 11 मार्च रोजी आढळलेल्या पहिल्या कोरोना बाधिताला येत्या तीन दिवसांत सुटी देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

कोरोनावर विजय हाच संकल्प करा, सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे आवाहन 

तीन दिवसानंतर पहिल्या बाधिताला सुटी होणार 
बुधवारी मेडिकल आणि मेयोतील संशयितांचा आकडा कमी आढळून आला आहे. दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवतांना योग्य काळजी घेत असल्याचे निदर्शनास आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात आली असल्याचेही दिसून आले. विशेष असे की, मेडिकलच्या कोरोना बाह्यरुग्ण विभागात थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येणार आहे. थर्मल स्कॅनरचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur corona positive patient to get discharge soon