अखेरची ठरली वाढदिवसाची पार्टी, आजी बोलवायला गेली पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या आनंदात जबलपूरचे मित्र-मैत्रिणीही सहभागी झाले होते. 3 फेब्रुवारीला वाढदिवस साजरा झाला. ती फार आनंदात होती. परंतु, आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कदाचित काळालाच ते मंजूर नसावे. तिच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तिने कोणतीही सुसाइड नोट लिहून ठेवली नाही, तर कुणाकडे खदखदही व्यक्‍त केली नाही. परंतु, तिची नक्‍कीच कोणतीतरी अडचण असावी.

नागपूर : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्‍टर तरुणीने वाढदिवस साजरा केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. निकिता राकेश सोनी (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतवारीत राहणारी निकिता सोनी (22) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. आई, तीन बहिणी, आजी-आजोबा असे आनंदी कुटुंब. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. लहान बहीण शिक्षण घेत आहे. आई ब्युटी पार्लरचे काम करते. निकिता जबलपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात डेंटिस्टचे शिक्षण घेत होती. यंदा ती दुसऱ्या वर्षाला होती. 3 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस असतो. त्यामुळे ती तीन दिवसांपूर्वीच घरी आली होती.

- Video : प्रवीण तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल केली ही महत्त्वणूर्ण मागणी... वाचा
 

डॉक्‍टर तरुणीची आत्महत्या
वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या आनंदात जबलपूरचे मित्र-मैत्रिणीही सहभागी झाले होते. 3 फेब्रुवारीला वाढदिवस साजरा झाला. ती फार आनंदात होती. परंतु, आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कदाचित काळालाच ते मंजूर नसावे. तिच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तिने कोणतीही सुसाइड नोट लिहून ठेवली नाही, तर कुणाकडे खदखदही व्यक्‍त केली नाही. परंतु, तिची नक्‍कीच कोणतीतरी अडचण असावी. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

- आत्महत्या : सरकार मारते कर्जमाफीच्या बाता, शेतक-यांचा बंद होईना कर्जाचा खाता
 

आजीला बसला धक्‍का
तीन फेब्रुवारीला वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची आई कामावर तर बहीण कॉलेजला निघून गेली. घरात केवळ आजी आणि निकिता दोघीच होत्या. दुपारी ती वरच्या माळ्यावरील खोलीत गेली. सायंकाळ झाल्यानंतरही ती खाली न आल्यामुळे चहा घेण्यासाठी आजी हाक देण्यासाठी वर गेली. मात्र, निकिताला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच त्यांना धक्‍का बसला. त्या खाली कोसळल्या आणि आरडाओरडा करायला लागल्या. शेजाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर प्रकार उघडकीस आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur dental student suicide after birthday party