Video : प्रवीण तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल केली ही महत्त्वणूर्ण मागणी... वाचा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

अगदी सुरुवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेत नव्हते. अशा काळात उपरोक्त चौघांनी हिंदू जनजागरण करीत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरण निर्मिती केली होती. त्यांची आंदोलन व रोखठोक भूमिकेमुळे आज राम मंदिराची निर्मिती दृष्टिक्षेपात आली. अयोध्येत राम मंदिर बांधतांना त्याकरिता बलिदान देणाऱ्यांचे स्मारक बांधण्याची आठवण मीपणा करणाऱ्यांनी ठेवावी, असा टोलाही तोगडिया यांनी सत्ताधारी भाजपला लगावला.

नागपूर  : भाजपच्या काही स्वार्थी नेत्यांमुळे हिंदुत्वाच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले असून आता ज्यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन लढा उभारला त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, विश्‍व हिंदू परिषदेचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल तसेच मंहत रामचंद्र परमहंस व महंत अवैधनाथ यांना भारतरत्न देण्याची मागणी तोगडियांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मी भक्त आहे. त्यांना भारतरत्न दिलेच पाहिजे. त्यांच्या नावाला आपला विरोध नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 

अगदी सुरुवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेत नव्हते. अशा काळात उपरोक्त चौघांनी हिंदू जनजागरण करीत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरण निर्मिती केली होती. त्यांची आंदोलन व रोखठोक भूमिकेमुळे आज राम मंदिराची निर्मिती दृष्टिक्षेपात आली. अयोध्येत राम मंदिर बांधतांना त्याकरिता बलिदान देणाऱ्यांचे स्मारक बांधण्याची आठवण मीपणा करणाऱ्यांनी ठेवावी, असा टोलाही तोगडिया यांनी सत्ताधारी भाजपला लगावला.

- तिकडे पीडितेचा संघर्ष सुरू आहे अन् ईकडे या दोन महिला नेत्या आपसात भिडल्या

स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या भाजपच्या काही स्वार्थी नेत्यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्वाच्या चळवळीला नुकसान पोहचविले. त्यामुळे हिंदुत्वाच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. आरोप करताना त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा संपूर्ण रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर होता.

शाहीनबागेत मुस्लिमांची ढाल करून हिंदू जनजागरण करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या घरी मुल्ला-मौलवींची बैठक झाल्यानंतर शाहीनबाग आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाच्या बदल्यात देशातील तीन कोटी बांगलादेशी घुसखोरांना अभय देण्यात आले आहे. त्यामुळेच एनआरसी देशभर लागू करण्यात आले नाही असे वक्तव्य पंतप्रधानांनी केल्याचा आरोपही यावेळी तोगडिया यांनी केला. भाजपा सर्वांच्या दृष्टीने अस्पृश्‍य पक्ष होता. कोणीही जवळ करायला तयार नव्हते. त्याकाळात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपाला साथ दिली. त्यांना महाराष्ट्रात सत्तेवर आणले.

- दत्तात्रयनगरात दुहेरी हत्याकांड, मामा भाचीची हत्या,पोलीस घटनास्थळी दाखल

शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितल्यानंतर भाजपाने ते मोठ्या मनाने द्यायला हवे होते. मात्र, कृतघ्न नेत्यांनी त्यास नकार दिला. सेनेला मुख्यमंत्रीपद नाकारून भाजपने मोठी चूक केल्याचेही तोगडिया म्हणाले. पत्रकार परीषदेला विश्‍व हिंदू परिषदेचे किशोर डिंकोडवा, अनुप जयस्वाल, राजेंद्रसिंग ठाकूर, हेमंत त्रिवेदी उपस्थित होते.

हिंगणघाटचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा
हिंगणघाट येथे तरुणीला जाळण्यात आल्याची घटना अतिशय दुदैवी आहे. महिलांना संरक्षण आणि सुरक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. येथे 100 पैकी फक्त 18 दोषींना शिक्षा होते. हिंगणघाट येथील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी आम्ही लावून धरणार असल्याचे तोगडिया यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin togadiya on balasaheb thackrey at nagpur