नागपूर जिल्हा यंदा 94.66 टक्‍क्‍यांनी "बल्ले बल्ले'...

file
file

नागपूर जिल्हा :  यंदा नागपूर जिल्ह्यातील निकाल समाधानकारक लागला असून जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे जाहिर झालेल्या निकालावरून दिसून येते. जिल्हयातून 61 हजार 341 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 44 हजार 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल 94.66 टक्‍के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा 22.92टक्‍के निकालाची टक्‍केवारी वाढली आहे.

शिपायाच्या मुलींची उत्तम कामगिरी
सावनेर : तालुक्‍यातील दहावीच्या निकालात मुलींनी उत्तम कामगिरी बजावली असून महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथील शिपायाची मुलगी सेजन सगन ढोके हीने 96.80 टक्के गुण मिळवून तालुक्‍यात अव्वल स्थान पटकावले. शहरातील शाळांमध्ये 100% निकाल देणाऱ्या जवाहर नेहरू शाळेतील साक्षी आडगूळकर या विद्यार्थिनीने 96.60 टक्के गुणाने दुसरे स्थान मिळविले आहे, तर याच शाळेतील हिमांशू रमेश बिरे 96.20 टक्के गुण मिळविले आहे. भालेराव हायस्कूलचा निकाल 93. 63टक्‍के लागला. या शाळेतून स्विटी नागदेवते 93 टक्के गुण मिळविल्याने शाळेत प्रथम तर 91 टक्के गुण मिळविणारी वैष्णवी लाडेकर ही दुसरी ठरली आहे. जवाहर कन्या विद्यालयाने 86.11टक्के निकाल दिला असून या शाळेची तेजस्विनी प्रकाश ठाकरे 94.20 टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम ठरली आहे.

अधिक वाचा : शेतात नव्हे, अहो मुख्य रस्त्यावर रोवले की धानाचे पऱ्हे...

बारा विद्यालयांनी गाठली शंभरी
कामठी :मागील वर्षीच्या तुलनेत25 टक्‍क्‍यांनी जास्त निकाल लागला आहे. तालुक्‍यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याने मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्‍यातील बारा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून मागील वर्षी फक्त दोन शाळांनी शंभरी गाठली होती. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण गतवर्षीप्रमाणे जास्त आहे. तालुक्‍यातील कामठी शहरातील रामकृष्ण शारदा मिशन स्कूल ऑफ होम सायन्स, सेठ रामनाथ लोईया, सरस्वती शिशू मंदिर तर आयडियल कॉन्हवेंट गुमथळा, आदर्श विद्यालय गुमथळा(गुमथी), गुरूकुल पब्लिक स्कूल वडोदा, एम.एन.एम. ब्राईट स्कूल येरखेडा, विवेकानंद विद्यालय पळसाट, टेमसना माध्यमिक विद्यालय टेमसना, राजीव विद्यालय जाखेगाव, भोसला मिलीटरी स्कूल पंचवटी कोराडी, भांगे पब्लिक स्कूल कोराडी या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

अधिक वाचा  : नागपूर जिल्ह्यातील "या' तालुक्‍यात होतात दररोजचे मृत्यू, कसे ते वाचा...

पारशिवनी तालुक्‍यात 8 शाळा शतप्रतिशत
कन्हान : तालुक्‍यातील8 शाळांचा निकाल शतप्रतिशत लागला असून कन्हान परिसरातील 6 शाळांचा समावेश आहे. बीकेसीपी स्कूल कन्हान, लालबहादुर शास्त्री विद्यालय बाबूलवाडा, भारतीय आदर्श विद्यालय तामसवाडी, विद्यामंदीर हायस्कूल कामठी कॉलरी, श्री नारायण विद्यालय कन्हान, साईनाथ विद्यालय बोरडा, जि.प.माध्यमिक शाळा टेकाडी कॉलोनी, सरस्वती न्यू इंग्लीश स्कूल यांचा निकाल शंभर टक्‍के लागला. इशा रामटेके भिवापूर तालुक्‍यातून प्रथम भिवापूर : विद्यानिकेतन इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी ईशा अजय रामटेके हिने95.20 टक्के गुण प्राप्त करित तालुक्‍यातुन प्रथम येण्याचा मान मिळवला. याच शाळेचा विद्यार्थी आदित्य शांतनू मरसकोल्हे व राष्ट्रीय विद्यालयाचा विद्यार्थी प्रज्योत शशिकांत भुसारी हे दोघे सारखे93.20टक्के गुण घेवून दुस-या कमांकावर राहिलेत. विद्यानिकेतन इंग्लिश शाळेचाच विद्यार्थी असलेला जगदिश कछवाह93टक्के गुण मिळवित तालुक्‍यात तिस-या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. विरखंडी (धापर्ला) येथील नितीन हायस्कूल जवळी येथील जि.प.शाळा व भिवापूर येथील सायंटीफिक कॉंव्हेंट व इंग्लिश मिडीयम शाळेचा निकाल शंभर टक्के आहे.

 
 
 संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com