19 लाखांच्या बनावट नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

आरोपींनी अजून काही बनावट नोटा लपवून ठेवल्या असल्याची माहिती आहे. त्याही लवकरच जप्त करण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.

नागपूर :  महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने मोठा ताजबाग परिसरात छापा टाकून 18 लाख 75 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणात लालू खान नावाच्या एका युवकाला अटक केली आहे. डीआरआय त्याच्या तीन साथीदारांचा शोध घेत आहे. 

मोठा ताजबाग परिसरात लालू खान हा पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. डीआरआयच्या पथकाने छापा टाकून लालू याच्याकडून 13 लाख 89 हजार रुपयांच्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तपासानंतर पोलिसांनी आणखी एका युवकाकडून 4 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

नवलच की! चक्‍क साप खातो कापूस

पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत हे जाळे पसरले आहे. ते उद्‌ध्वस्त करण्याचा विडा डीआरआयने उचलला आहे. लालू याची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. त्याद्वारे मिळत असलेल्या माहितीच्या आधारे आणखी काही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आरोपींनी अजून काही बनावट नोटा लपवून ठेवल्या असल्याची माहिती आहे. त्याही लवकरच जप्त करण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.

बनावट नोटा बाळगणे आणि त्यांचा वापर करणे हा भारतीय सीमाशुल्क कायदा 1962च्या कलम 11अन्वये व कलम 135अन्वये गुन्हा आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, fake currency, crime