राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरला मिळाले पाच नवे पोलिस उपायुक्त

अनिल कांबळे
Thursday, 1 October 2020

ग्रामीणचे अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत यांची अकोला येथे बदली झाली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलिस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश दिले आहेत.

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्य पोलिस दलातील पोलिस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अखेर बुधवारी रात्रीच्या सुमारास झाल्या. नागपूर शहराला नवीन पाच पोलिस उपायुक्त मिळाले आहेत.

नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक नूरुल हसन, एसआरपीएफ जालना येथील अक्षय शिंदे, एसआरपीएफ अमरावती येथील लोहित मतानी, पुणे लोहमार्गाचे अधीक्षक दीपक साकोरे आणि बसवराज तेली यांचा समावेश आहे. नागपुरातील विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांची महामार्ग सुरक्षा पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षकपदी तर पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांची नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

ग्रामीणचे अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत यांची अकोला येथे बदली झाली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलिस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश दिले आहेत.

आयपीएसपदी पदोन्नती मिळालेल्यांची नवे पुढीलप्रमाणे

एस. जी. वायसे पाटील, ए. एम. बारगळ, एन. टी. ठाकूर, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान, एम. एम. मोहिते (शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील, एस. एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली. हे सर्वजण गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur gets five new police commissioners