नागपूर पदवीधर मतदारसंघ : तुकाराम मुंढेंमुळे झाला संदीप जोशींचा पराभव! सोशल मीडियावर चर्चा

Sandeep Joshi was defeated by Tukaram Mundhe
Sandeep Joshi was defeated by Tukaram Mundhe

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभिजित वंजारी यांचा विजय निश्‍चित झाला आहे. आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाची कारण मीमांसा सुरू झाली आहे. महापौर संदीप जोशींचा पराभव होत असताना तुकाराम मुंढेंची आठवण न झाली तर नवलच, अशा प्रतिक्रिया काही नागपूरकर देत आहेत. निकालाच्या दिवशीही तुकाराम मुंढे यांची आठवण होणे, ही त्यांच्या कार्याची पावती आहे, असेच म्हणावे लागेल.

महाविकासआघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून फेब्रुवारी २०२० ला नागपुरात आले आणि २६ ऑगस्टला त्यांची येथून बदली झाली. अवघे सहा महिने त्यांची येथील कारकीर्द राहिली.

राज्यात महाविकास आघाडी आणि केंद्रात भाजप अशी स्थिती असल्यामुळे की काय, अगदी पहिल्या दिवसापासूनच आयुक्त आणि महापौर यांच्यात खटके उडायला लागले. त्यांच्यावर सदर पोलिस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. स्मार्ट सिटीचा मुद्दा उपस्थित करून तुकाराम मुंढेंना घेरण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला होता.

‘तुकाराम मुंढे प्रकरण भोवले, इमानदार माणसाला त्रास दिला की असेच होते’, अशा प्रतिक्रिया देऊन युवा समाजमाध्यमांवर आज व्यक्त होत आहेत. तुकाराम मुंढेंच्या कार्यप्रणालीने नागपुरातील आणि राज्यभरातील युवा प्रभावित झाला होता. याची साक्ष त्यांची नागपुरातून बदली झाल्यानंतर त्यांच्या निरोपाच्या दिवशी आयुक्तांचे शासकीय निवासस्थान ‘तपस्या’ समोर हजारो युवांनी दिली.

एकही संधी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही

तुकाराम मुंढे यांना अडचणीत पकडण्याची एकही संधी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोडली नव्हती. सर्वसाधारण सभेत मुंढेंना कात्रीत पकडण्यासाठी सत्ताधारी गटातील प्रत्येक सदस्य तयारच राहत होता. येवढे की, कोरोनाच्या काळात कविवर्य सुरेश भट सभागृहात सभेतून मुंढेंना बहिर्गमन करावे लागले होते. त्याचाही राजकीय फायदा उचलण्याचे पुरेपूर प्रयत्न तेव्हा करण्यात आले होते. पण मुंढे आपल्या भूमिकेवरून ‘टस से मस’ नव्हते झाले आणि आपला झंझावात सुरूच ठेवला होता. अगदी बदली होईपर्यंत...

हा महापौरांच्या विरोधातील रोष

तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या दिवशी नागपुरातील युवा मुंढेंना निरोप देण्यासाठी कोरोनाचे लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर उतरला होता. आयुक्तांच्या बंगल्यासमोर रस्त्याच्या दुतर्फा शिस्तीत उभे राहून त्यांच्या गाडीवर गुलाबकळ्यांचा वर्षाव केला होता. तेव्हा ‘हा महापौरांच्या विरोधातील रोष आहे’, अशा प्रतिक्रिया गर्दीतून येत होत्या. तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना अगदी पहिल्या दिवसापासून महापौर-आयुक्त वाद सुरू झाला होता. महापालिकेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना जोशींनी जो त्रास दिला, त्याचे परिणाम त्यांनी या निवडणुकीत भोगले, असा नेटकऱ्यांचा सूर आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com