
नागपूरवरून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे पर्यटनासाठी जात असलेल्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये एक तरुणी जागीच ठार झाली असून अन्य तिघे जखमी झाले आहेत.
चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा सफारीसाठी आलेल्या नागपुरातील एका कुटुंबीयाचे वाहन नाल्यात कोसळले. यात वाहनातील तरुणी जागीच ठार झाली, तर तिघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 1) घडली. मृत युवतीचे नाव सना गोयल (अग्रवाल), असे आहे.
हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षा कमी भाव
नागपूरहून येणारे पर्यटक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोलारा गेटमधून सफारीसाठी येतात. त्याचप्रमाणे आज नागपूर येथील अमिनेश गोयल (अग्रवाल) आपल्या कुटुंबासह आपल्या वाहनाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी निघाले होते. तुकुम गावानजीक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याजवळील भडगा नाल्यावरील पुलावर भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या महिला चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन नाल्यात कोसळले.
हेही वाचा - जागतिक एड्स दिवस : प्रथमच घटला एचआयव्हीग्रस्तांचा आकडा...
गाडीखाली २० वर्षीय तरुणी दबल्याने त्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. अमीनेष गोयल हे गंभीर जखमी झाले, तर अन्य काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना आधी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे.