नागपुरातील उद्योग सुरू झाले खरे पण... कच्चा मालच मिळेना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

तिसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शासनाने कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगाचे चाक पुन्हा फिरावे यासाठी अत्यावश्‍यक सेवेतील उद्योगांना परवानगी दिली. मात्र, उद्योजकांसमोरच्या अडचणी थांबलेल्या नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आल्याने बाहेरून येणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. 

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मे च्या आदेशानंतर काही अटी व शर्तींवर टाळेबंदी शिथिल करण्यात आले होते. सरकारच्या निर्णयानंतर नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र काहीसा पूर्वपदावर येऊ लागल आहे. जिल्ह्यात 2147 छोटे, मोठे उद्योग सुरू झाले असून यात 45 हजार कामगार रुजू झालेत. ग्राहक नसल्याने सर्वांकडून निम्म्या क्षमतेने काम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 

तिसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शासनाने कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगाचे चाक पुन्हा फिरावे यासाठी अत्यावश्‍यक सेवेतील उद्योगांना परवानगी दिली. मात्र, उद्योजकांसमोरच्या अडचणी थांबलेल्या नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आल्याने बाहेरून येणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. 

दुसरीकडे परप्रांतियांसह स्थानिक कामगार, कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने शहरे सोडून मोठ्या संख्येने गाव जवळ केले आहे. त्यामुळेच उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्यास अडचणी येत आहेत. नागपूर जिल्ह्यात उमरेड, भिवापूर, हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्‍वर, मौदा या एमआयडीसीमध्ये बहुतेक कारखाने सुरू झाले आहेत. बुटीबोरी, हिंगणा मधील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वाहनांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या डेडिकेटेड बसमधून परवानगी दिली आहे. औद्योगिक क्षेत्रातील केईसी, सीएटसह काही मोठ्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत. इंडोरामा आणि जॉन्ससन या कंपन्यांनी आपले काम सुरू केले आहे. 

सावध व्हा, सॅनेटायझर दान देण्याच्या नावावर तरुणास बसला मोठा फटका, वाचा हा प्रकार...

 

कच्चा माल व कर्ज तातडीने उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यात सुरू असलेले निम्मे उद्योग पुन्हा बंद पडतील. वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू न झाल्याने कच्च्या मालाची टंचाई उद्योजकांना जाणवू लागली आहे. उद्योजकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत बॅंकांना अद्यापही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे उद्योजकांकडील खेळते भांडवल संपले आहे. 
- चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur industries facing raw marerial supply issue